Sholey Movie : शोलेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्ताने 50 रंजक कहाण्या

1) शोले १५ ऑगस्ट १९७५ ला प्रदर्शित2) मिनर्व्हा मुंबईतील मुख्य थिएटर, मिनर्व्हामध्ये सत्तर एमएम व स्टिरिओफोनिक साऊंड सिस्टीम3) मिनर्व्हाची तेव्हाची आसनक्षमता होती १४९९ सीट्स4) अपर स्टॉलच्या मूळ तिकिटाची किंमत साडेचार तर ब्लॅक तिकिटाची १५ रुपये5) बाल्कनीचं मूळ तिकीट साडेपाच रुपये तर हेच तिकीट ब्लॅकमध्ये २० रुपयांना विकलं जायचं6) शोलेचा मुक्काम मिनर्व्हात तीन वर्षे ३,६,९ असे दिवसभरातले तीन शोज7) दोन वर्षे मिनर्व्हात ११ च्या मॅटिनी शोमध्ये झळकला सिनेमा8) मिनर्व्हात शोलेला दोन वर्ष पूर्ण झाल्यावर डेकोरेशन बदलण्यात आलं9) न्यू एक्सलसियर, चेंबूरच्या बसंतमध्येही सत्तर एमएम व स्टिरिओफोनिक साऊंड सिस्टीम स्वरुपात सिनेमा प्रदर्शित. मुंबईत इतरत्र पस्तीस एमएम10) अमिताभ बच्चन-जया बच्चन, धर्मेंद्र-हेमा मालिनी या रीअल जोड्या रिलमध्येही एकत्र11) अमजद खानची गब्बरची भूमिका चांगलीच गाजली12) कितने आदमी थे...आजही हिट डायलॉग13) सलीम खान, जावेद अख्तर यांनी लिहिलेली जबरदस्त पटकथा व जोरदार संवाद.14) आर.डी.बर्मन यांच्या संगीताने गाजलेला शोले15) असरानी यांचा जेलर आजही रसिकांच्या मनात घर करून16) शोले सिनेमाची मूळ कथा जपानी आणि परदेशी सिनेमांमधून. विशेषत: अकिरा कुरोसावा दिग्दर्शित सेव्हन समुराईवर आधारित.17) शोले सिनेमासाठी एम.एस.शिंदे यांना संकलनासाठी एकमेव फिल्मफेअर पुरस्कार18) शोलेकरता मुंबईसाठी तीन, उत्तर प्रदेशसाठी एक, एक दिल्लीसाठी अशा पाच सत्तर एमएम व स्टिरिओफोनिक साऊंड सिस्टीम प्रिंट्स बनवल्या गेल्या होत्या19) ठाकूर गब्बरला पोलिसांकडे देतो असा सिनेमाचा शेवट दाखवण्यात आला20) त्या काळातील आणीबाणीच्या परिस्थितीत हा बदल केलेला शेवट21) मूळ शेवटामध्ये ठाकूर गब्बरला मारून टाकतो अशी घटना22) शोलेच्याच स्पर्धेत 'जय संतोषी माँ' सिनेमाचीही दमदार वाटचाल23) 'ये दोस्ती हम नही तोडेंगे' हे गाणं किशोर कुमार, मन्ना डे यांनी गायलेलं मेल ड्युएट साँग24) 'ये दोस्ती... हे मैत्रीची महती सांगणारं आयकॉनिक गीत25) शोले सिनेमाची प्रत्येक व्यक्तिरेखा लक्षात राहणारी26) शोले आणि रामगढ के शोले दोन्हींमध्ये अमजद खान यांची भूमिका27) शोलेसोबतच प्रदर्शित झालेला गरिबी हटाव सिनेमा कधी आला आणि गेला ते कळलंही नाही28) शोले सिनेमातील सचिन पिळगावकर आणि विजू खोटे या मराठी कलाकारांच्या भूमिकाही लक्षवेधक29) शोलेमध्ये कला दिग्दर्शक राम येडेकर, संकलक एम. एस. शिंदे यांचंही योगदान30) गब्बर सिंगची भूमिका अभिनेते डॅनी यांना ऑफर मिळाल्याची तेव्हा चर्चा31) रणजित यांनाही ही ऑफर मिळाल्याची तेव्हाची चर्चा32) शोलेचं शूटिंग बंगळुरू, पनवेलजवळच्या जासई गावात33) बंगळुरूमध्ये रामनगर नावाच्या गावात रामगढचा सेट34) कला दिग्दर्शक राम येडेकर यांनी साकारलं रामगढ35) रामगढला आज पर्यटन केंद्र म्हणून ओळखलं जातं36) जासई गावात शोलेमधील रेल्वेसंदर्भातले गाजलेले सीन शूट37) जेलमधलं चित्रीकरण मुंबईच्या राजकमल स्टुडिओत38) शोलेवरूनच बेतलेला सिनेमा रामगढ के शोले १९९१ मध्ये प्रदर्शित39) कानपूर के शोले, मालेगाव के शोले, दो शोले हेही सिनेमे प्रदर्शित40) आँधी तूफान सिनेमाही शोलेवरच बेतलेला41) 'रामगोपाल वर्मा की आग' हा शोलेचा फसलेला रिमेक42) 'रामगोपाल वर्मा की आग'मध्ये अमिताभने खलनायक साकारलेला43) शोलेच्या संवादांची लाँग प्ले डिस्क काढण्यात आली44) शोलेच्या बॅकग्राऊंड म्युझिकचीही लाँग प्ले रेकॉर्ड काढण्यात आली45) हिंदी सिनेमामध्ये शोलेआधीचं आणि शोलेनंतरचं सिनेयुग असं म्हणत दोन कालखंडांचं वर्णन केलं जातं46) शोलेनंतर अॅक्शनपट आणखी जोमाने वाढले47) शोले प्रदर्शित झाला तेव्हा सिंगल स्क्रीन थिएटरचं युग48) शोलेची व्हिडीओ कॅसेट आली तेव्हा कॅसेटचं 10 रुपये भाडं होतं49) शोलेच्या पन्नाशीनिमित्ताने नाण्याची प्रतिकृती तयार करण्यात आली50) धर्मेंद्र यांच्या टाकीवरील सीनच्या संदर्भाने 'शोले स्टाईल' आंदोलन हा शब्दप्रयोग रूढ