Shiv Thakare Voting : अभिनेता शिव ठाकरे (Shiv Thakare) हा बिग बॉस मराठी या कार्यक्रमातून घरोघरी पोहचला. त्या सिजनच्या विजेतेपदावर त्याने नाव नोंदवलं. त्यानंतर तो अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या राज्यात लोकसभा निवडणुकांचे मतदान पार पडत आहे. राज्यातील एकूण 8 जिल्ह्यांमध्ये लोकसभा निवडणुकांसाठीचे मतदान पार पडले. यामध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे. मूळचा अमरावतीचा असलेल्या शिव ठाकरेने देखील त्याच्या मतदानाचा हक्क बजावला. 


शिवने अमरावतीमध्ये त्याच्या मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच यावेळी त्याने लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करण्याचे देखील नागरिकांना आवाहन करणार आहे. यावेळी शिव ठाकरेने म्हटलं की, मतदान करण्यासाठी मी मुंबईवरुन आलोय. त्यामुळे प्रत्येक तरुणांनी देखील मतदान केलं पाहिजे, असं आवाहन शिव ठाकरे याने यावेळी केलं. 


शिव ठाकरेच्या संपूर्ण कुटुंबाने बजावला मतदानाचा हक्क 


अभिनेता शिव ठाकरे याच्या संपूर्ण कुटुंबाने मतदानाचा हक्क बजावला. शिव ठाकरेने मतदान केल्याचे फोटो देखील त्याच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये त्याची आजी देखील दिसत आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. त्याचप्रमाणे अनेकांनी यावर कमेंट्स केल्याचं देखील पाहायला मिळतंय. 


 शिव ठाकरेने जेव्हा बिग बॉस मराठी 2 च्या विजेतेपदावर नाव कोरलं तेव्हापासून तो प्रसिद्धीझोतात आला. त्यानंतर त्याची वर्णी हिंदी बिग बॉसमध्ये लागली. हिंदी बिग बॉसमध्येही तो रनर अप ठरला होता. त्याच्या वागणुकीमुळे तो कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. तसेच त्याच्या घरातील वागण्यामुळे सलमान खानचा देखील आवडता झाला. त्यानंतर तो झलक दिखला जा, खतरों के खिलाडी यांसारख्या कार्यक्रमांमध्येही दिसला होता. 






अमरावती लोकसभा मतदारसंघाची स्थिती


अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपकडून नवनीत राणा यांना तिकीट देण्यात आलंय. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीकडून काँग्रेसला ही जागा देण्यात आली. काँग्रेसकडून बळवंत वानखेडे यांना ही उमेदवारी देण्यात आलीये. अमरावती लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. यावेळी लोकसभा मतदारसंघातील अनेक दिग्गजांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला.  


 


ही बातमी वाचा : 


Ravi Kishan : रवी किशन यांच्या डीएनए चाचणीवर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला, मुलगी म्हणून स्वीकारण्यास अभिनेत्याने दिला नकार