Shiv Thakare : हिंदीनंतर बिग बॉस (Bigg Boss) या कार्यक्रमाने मराठीतही पसंती मिळाली. या कार्यक्रमाच्या पहिल्या सिजनवर अभिनेत्री मेघा धाडे हिने नाव कोरलं तर दुसऱ्या सिजनमध्ये शिव ठाकरेने (Shiv Thakare) ट्रॉफी मिळवली. यावेळी शिवला बक्षीसरुपी 25 लाख रुपये मिळाले होते. पण ही पूर्ण रक्कम मला मिळाली नाही, असं शिवने नुकतच एका मुलाखतीमध्ये म्हटलं. तसेच यामधून माझे बरेच पैसे कापले गेल्याचा खुलासा देखील त्याने यावेळी केला आहे. 


शिवने नुकतच  हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंह यांच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने बिग बॉस मराठीच्या सिजनमध्ये मिळालेल्या बक्षीसावर भाष्य केलं आहे. शिव हा रोडिज या कार्यक्रमातून पुढे आला. त्यानंतर त्याला मराठी बिग बॉसमधून खरी ओळख मिळाली. त्यानंतर तो हिंदी बिग बॉसमध्येही झळकला होता. पण मराठी बिग बॉसमध्ये त्याला जे बक्षीस मिळालं त्यामधली बरीच रक्कम कापण्यात आली.याबाबत स्वत: खुलासा केला आहे. 


शिव ठाकरेने काय म्हटलं?


मला हिंदीमध्ये गेल्यावर कळलं की लोकांना खूप पैसे मिळतात. कारण मराठी बिग बॉसमध्ये मला 25 लाख रुपये मिळाले होते. पण कार्यक्रमाच्या दोन तास आधी निर्मात्यांनी त्यातली आठ लाख रुपये रक्कम कमी झाली. त्यामुळे ती रक्कम 17 लाख रुपये झाली. पण माझ्या अकाऊंटवर फक्त 11.5 लाख रुपये जमा झाले. नंतर मला कळालं की, यामधून माझ्या कपड्यांवरचे, आईबाबांच्या विमान तिकीटाचे पैसे पण कापले गेले. त्यामुळे मला ते तितकेच पैसे मिळाले, असा मोठा खुलासा यावेळी शिव ठाकरेने केला आहे. 






शिव ठाकरेने जेव्हा बिग बॉस मराठी 2 च्या विजेतेपदावर नाव कोरलं तेव्हापासून तो प्रसिद्धीझोतात आला. त्यानंतर त्याची वर्णी हिंदी बिग बॉसमध्ये लागली. हिंदी बिग बॉसमध्येही तो रनर अप ठरला होता. त्याच्या वागणुकीमुळे तो कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. तसेच त्याच्या घरातील वागण्यामुळे सलमान खानचा देखील आवडता झाला. त्यानंतर तो झलक दिखला जा, खतरों के खिलाडी यांसारख्या कार्यक्रमांमध्येही दिसला होता. 


ही बातमी वाचा : 


Adah Sharma : बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीतील हजेरीमुळे अदा शर्मा ट्रोल; अभिनेत्रीनेही दिलं चोख उत्तर, 'दहशतवादी हे शत्रू असतात...'