Shilpa Shetty Viral Post Reaction: बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) सध्या जोरदार चर्चेत आहे. सीजेपी आंदोलनानंतर अनेकजण आता 'आरक्षण' या विषयावर बोलू लागले आहेत. यातच शिल्पा शेट्टीची एक कथित पोस्ट सोशल मीडियावर फिरत होती. या पोस्टमध्ये जातीय आरक्षण रद्द करण्याच्या बाजूचं वक्तव्य केल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, यावर अभिनेत्री शिल्पा शेट्टीने प्रतिक्रिया दिली असून आरक्षणासंदर्भात तिने कुठलीही पोस्ट केली नसल्याचं सांगत, व्हायरल होत असणारे सगळे दावे निराधार खोटे आणि बनावट असल्याचं स्पष्ट केलं. तिने चाहत्यांना आणि सोशल मीडिया वापरणाऱ्यांना तिच्या नावाने व्हायरल होणाऱ्या अशा दिशाभूल करणाऱ्या पोस्टवर विश्वास न ठेवण्याचं आवाहनही केलं.
काय होतं या व्हायरल पोस्टमध्ये?
यात 'आरक्षणाला हात लावू नका.सर्वसाधारण प्रवर्गातील डॉक्टरांनी फक्त त्याच प्रवर्गातील रुग्णांवर उपचार करावेत आणि इतर सर्व डॉक्टरांनी त्यांच्या त्यांच्या जातीतील रुग्णांवर उपचार करावेत.काही वर्ष अशी व्यवस्था लागू करून पहा, मग लोक स्वतःच जातीय आरक्षण संपवण्याची मागणी करतील.आरक्षणामुळे कौशल्य मिळत नाही.' असा मजकूर या व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये होता. ही पोस्ट शिल्पा शेट्टीने केल्याचं दाखवण्यात आलं होतं.
बनावट पोस्टवर शिल्पा शेट्टीची संतप्त प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या जातीय आरक्षणाबाबतच्या कथित पोस्टने खळबळ उडाल्यानंतर, अभिनेत्री शिल्पा शेट्टीने या सगळ्या प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली ' माझ्या नावाने आरक्षणाबाबत खोटी विधान जोडली जात असल्याचे पाहून मला धक्का बसलाय. हा पूर्णपणे बनावट आणि द्वेषातून पसरवलेला खोटा प्रचार आहे. कृपया अशा फेक पोस्ट किंवा अफवांवर विश्वास ठेवू नका.' असं तिने एक्स माध्यमावर स्पष्ट केलं.
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या कामाबाबत बोलायचं झाल्यास, ती नुकतीच कन्नड चित्रपटात झळकली होती. या चित्रपटाचं नाव 'केडी : द डेव्हिल' असं होतं. या चित्रपटात ध्रुवसर्जा प्रमुख भूमिकेत होता.30 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित झालाय. याशिवाय शिल्पाने ' माँ है ना ' या कुकिंग शो चे सूत्रसंचालनही केलं होतं. या कार्यक्रमाचा समारोप नुकताच 1 जुलै रोजी झाला. चित्रपट आणि टीव्ही सोबतच शिल्पा सोशल मीडियावर हे सक्रिय असते. ती नियमितपणे फिटनेस तिच्या वैयक्तिक आयुष्यातील आणि व्यावसायिक घडामोडींच्या अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते.
