Shilpa Shetty Bastian restaurant Not Shutting Down : अभिनेत्री शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) बुधवारी (दि.3) तिचं वांद्रे येथील ‘बॅस्टियन’ रेस्टॉरंट बंद होणार असल्याचं जाहीर केलं. याबाबतची घोषणा तिने इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून केली होती. शिवाय आज रात्री या रेस्टॉरंटमध्ये शेवटची सेवा देण्यात असल्याचंही तिने स्पष्ट केलं होतं. शिल्पा शेट्टीच्या (Shilpa Shetty) या घोषणेनंतर याबाबत सोशल मीडियावर तुफान चर्चा झाली. त्यानंतर आता शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करून या विषयावर स्पष्टीकरण दिलं. व्हिडीओ शेअर करताना तिने चाहत्यांना रेस्टॉरंटबद्दलचं प्रेम "टॉक्सिक" करू नये, अशी विनंतीही केली.
बॅस्टियन बांद्राबाबत शिल्पाचं स्पष्टीकरण
शिल्पा व्हिडीओमध्ये म्हणते,"नाही, मी बॅस्टियन बंद करत नाहीये. मी वचन देते! मला 4450 कॉल्स आले आहेत. एक गोष्ट नक्की आहे, मला बॅस्टियनसाठी लोकांचं प्रेम जाणवतंय. पण हे प्रेम टॉक्सिक करू नका. बॅस्टियन कुठेही जात नाहीये. हो, जड अंतःकरणाने आम्हाला वांद्रे येथील हे रेस्टॉरंट बंद करावं लागलं आहे. पण दोन नवीन रेस्टॉरंट आपण आपल्या सेवेत आणत आहोत."
तिच्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये शिल्पाने स्पष्ट केलं की, "बांद्रा बॅस्टियन आमच्या बॅस्टियन हॉस्पिटॅलिटी सर्वांना प्रचंड आवडली, तेच मूळ रुप सर्वांना माहिती आहे. जसं झाड नवीन फळं देते, तसंच आमचं आवडतं बांद्राचं रेस्टॉरंट.... आता एका नवीन जागी सुरु करत आहोत. येथे ‘अम्माकाई’, दक्षिण भारतीय मंगळोरीअन खाद्यसंस्कृती उपलब्ध असणार आहे. तुमचं आवडतं बॅस्टियन आता जुहूला जाणार आहे, ‘बॅस्टियन बीच क्लब’ या नावाने. त्यामुळे बॅस्टियन बंद होत नाहीये, कुठेही जात नाहीये!!!!!"
बॅस्टियन मुंबईचं अधिकृत निवेदन
बॅस्टियन मुंबईच्या सोशल मीडिया पेजवरूनही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलं. त्यात स्पष्ट करण्यात आलं की," बॅस्टियन बांद्रा बंद होत आहे, पण त्याच्या जागी अम्माकाई आणि बॅस्टियन बीच क्लब सुरू होणार आहेत, तेही ऑक्टोबरच्या मध्यापासून... बांद्रा आमची सुरुवात होती आणि ते आता बंद होत असले तरी नवीन सुरु होत आहे."
शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांच्यावर कायदेशीर संकट
दरम्यान, बॅस्टियन बांद्रा बंद होत असतानाच शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर ₹60 कोटींच्या फसवणुकीचे आरोप व्यावसायिक दीपक कोठारी (डायरेक्टर, लोटस कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लि.) यांनी केले आहेत. एएनआयशी बोलताना शिल्पा आणि राज यांचे वकील प्रशांत पाटील यांनी सर्व आरोप फेटाळले. ते म्हणाले, "सर्व आरोप खोटे आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या