Sherlyn Chopra Removed Breast Implants: अभिनेत्री शर्लिन चोप्रानं (Sherlyn Chopra) बॉलिवूडच्या (Bollywood) अगदी मोजक्याच सिनेमांमध्ये काम केलंय, पण तरिसुद्धा तिची चर्चा इंडस्ट्रीच्या सुपरस्टार अभिनेत्रींपेक्षा (Superstar Actress) जास्त असते. शर्लिन चोप्रा तिच्या लूक, तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे अनेकदा चर्चेत असते. तसेच, तिचे व्हिडीओही सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असतात. पण, सध्या शर्लिन चोप्रा (Actress Sherlyn Chopra) पुन्हा एकदा चर्चेत आली ती, एका वेगळ्याच मुद्द्यामुळे. अभिनेत्री शर्लिन चोप्रानं ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी (Sherlyn Chopra Breast Implant Surgery) केलीय. तसेच, तिनं तिच्या ब्रेस्टमधून सिलिकॉन कप्स (Silicone Cups) काढून टाकले आहेत. तसेच, तिनं सर्वांना आवाहन केलंय की, स्वतःच्या शरीराशी अजिबात छेडछाड करू नका. 

Continues below advertisement

काही दिवसांपूर्वी शर्लिननं एक व्हिडीओ शेअर केलेला, ज्यामध्ये तिनं जाहीर केलेलं की, तिचे ब्रेस्ट इम्प्लांट काढून टाकले जातायत, कारण ते अस्वस्थ करत होते. आता, अभिनेत्रीनं शस्त्रक्रियेनंतर तिचे सिलिकॉन ब्रेस्ट इम्प्लांट दाखवणारा एक व्हिडीओ शेअर केलाय.

शर्लिन चोप्रानं केलीय ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी 

अभिनेत्री शर्लिन चोप्रानं ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी केली आहे. तिच्या ब्रेस्टमधून तिनं सिलिकॉन कप्स काढून टाकले आहेत. या सिलिकॉन कप्सचं वजन प्रत्येकी 825 ग्रॅम आहे. शर्लिन यापूर्वीही सोशल मीडियावर कॉस्मेटिक सर्जरीबद्दल उघडपणे बोललेली. यावेळी तिनं उघड केलंय की, तिनं यापूर्वी लिप फिलर्सही काढले होते आणि आता ब्रेस्ट इम्प्लांटही काढलेत. याशिवाय, शर्लिन चोप्रानं सोशल मीडिया पोस्टद्वारे तरुणांना कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला बळी पडू नका आणि जसे आहात, तसेच राहण्याचा इशारा दिलाय. 

Continues below advertisement

शिर्लिन चोप्रा व्हिडीओ शेअर करत म्हणाली... 

शर्लिन चोप्रानं एक व्हिडीओ शेअर केलाय, ज्यामध्ये ती म्हणाली की, "माझ्या छातीवरून हे जड ओझं उतरलंय... याचं वजन 825 ग्रॅम होतं. मला आता फुलपाखरासारखं हलकं वाटतंय. मी आपल्या देशातील तरुण पिढीला विनंती करते की, जर त्यांना सोशल मीडियावर काही नकारात्मक घडताना दिसलं, तर त्यांना बाहेरच्यांचं वॅलिडेशन मिळावं, यासाठी आपल्या शरीरासोबत अजिबात खेळ करू नका..." 

"तुम्हाला जे काही सहन करावं लागेल ते करा, त्याचे फायदे आणि तोटे तोलून पाहा... तुमच्या कुटुंबाचा आणि बाहेरील वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कोणत्याही गोष्टीत घाई करू नका... गर्दीचा भाग बनू नका... तुमची प्रामाणिकता आणि वास्तविकता जपा. मला खरोखर वाटतंय की, आपण कोणत्याही प्रकारचं ओझं घेऊ नये...", असं शर्लिन चोप्रा म्हणाली आहे. 

"आता मला खूप हलकं वाटतंय..." : शर्लिन चोप्रा 

"हे माझे वैयक्तिक मत आहे, इतरांची मतं वेगळी असू शकतात. मी माझ्या टीमचं आणि डॉक्टरांच्या टीमचं आभार मानू इच्छिते, ज्यांनी माझी ब्रेस्ट इम्प्लांट शस्क्रिक्रिया करुन सिलिकॉन कप्स यशस्वीरित्या काढले आहेत. शस्त्रक्रियेच्या मदतीनं हे शक्य झालंय. मी आता रिकव्हरी स्टेजमध्ये आहे... मी सिलिकॉन-मुक्त आहे आणि लवकर बरी होतेय. माझे ब्रेस्ट इम्प्लांट काढून टाकल्यानंतर मला खूप हलकं वाटतंय.", असंही शर्लिन चोप्रा म्हणाली आहे.  शर्लिननं असाही खुलासा केलाय की, तिला काही काळापासून छातीत आणि शरीरात वेदना होत होत्या, ज्या ब्रेस्ट इम्प्लांटमुळे होत होत्या. ही अस्वस्थता आता दूर झालीय. दरम्यान, शर्लिनसारख्या इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्रींनी ब्रेस्ट इम्प्लांट, नाकाची शस्त्रक्रिया आणि लिप फिलर केले आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Nora Fatehi Breaks Silence On Drug Syndicate Allegations: 'याची मोठी किंमत मोजावी लागेल...'; ड्रग्ज स्कँडलमध्ये नाव आल्यानंतर नोरा फतेहीची चिडचिड, ट्रोलर्सना म्हणाली...