Nora Fatehi Breaks Silence On Drug Syndicate Allegations: सध्या बॉलिवूड (Bollywood News) आणि ड्रग्ज प्रकरण (Drug Case) हे जणू काही समीकरणंच झालंय. बॉलिवूड सेलिब्रिटींवर (Bollywood Celebrities) ड्रग्ज प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप अगदी नियमितपणे केला जातो. अलिकडेच, मुंबई पोलिसांच्या अँटी-नार्कोटिक्स सेलनं दुबईस्थित (Dubai) अंडरवर्ल्ड डॉन (Underworld Don) दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) चा साथीदार सलीम डोला (Salim Dola) याच्याकडून चालवल्या जाणाऱ्या एका मोठ्या ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश केलेला. यानंतर, अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) सह अनेक बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींची नावं समोर आलेली.
अटक केलेल्या आरोपीनं दावा केलाय की, यामध्ये अनेक प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटींचा सहभाग असून त्यानं अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) चंही नाव घेतलेलं. आता, नोरा फतेही (Nora Fatehi) नं या प्रकरणावर आपलं मौन सोडलंय आणि ट्रोलर्सवर निशाणा साधलाय.
नोरा फतेही नेमकं काय म्हणाली? (What Did Nora Fatehi Say?)
नोरा फतेही (Nora Fatehi) नं तिच्यावर होत असलेल्या ड्रग्ज रॅकेटसंदर्भातील मोठ्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे. नोरा फतेही (Nora Fatehi) नं स्टोरी शेअर करत संताप व्यक्त केला आहे. नोरा फतेही (Nora Fatehi) नं लिहिलंय की, "मी अशा पार्ट्यांमध्ये जातच नाही. मी सतत प्रवासात असते आणि माझ्या कामावर माझं खूप प्रेम आहे. त्यामुळे, माझं खासगी आयुष्यही नाहीये. मी स्वतःला अशा पार्टी करणाऱ्या लोकांशी जोडत नाही. माझ्या सुट्टीच्या दिवशी मी एकतर दुबईतील समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या माझ्या घरी आराम करत असते किंवा माझ्या हायस्कूलच्या जुन्या मित्रांसोबत असते. मी माझा संपूर्ण दिवस आणि रात्री फक्त माझ्या स्वप्नांवर आणि ध्येयांवर काम करते..."
"तुम्ही जे काही वाचता त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. जाणूनबुजून मला टार्गेट केलं जातंय. पण यावेळी मी ते अजिबात सहन करणार नाही. हे आधी एकदा घडलं होतं, तुम्ही लोकांनी खोटं बोलून मला संपवण्याचा प्रयत्न केलेला. आणि मी ते शांतपणे पाहत होते. जेव्हा प्रत्येक जण माझं नाव बदनाम करण्याचा, माझी प्रतिष्ठा खराब करण्याचा आणि मला 'क्लिकबेट' म्हणून वापरण्याचा प्रयत्न करत होता. माझ्याशी काहीही संबंध नसलेल्या परिस्थितीत माझं नाव आणि प्रतिष्ठा वापरण्यापासून कृपया दूर रहा... याची मोठी किंमत मोजावी लागेल...", असा थेट इशारा नोरा फतेही (Nora Fatehi) नं दिला होता.
मुंबई पोलिसांकडून ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश (Drug Syndicate Exposed by Mumbai Police)
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) चा सहकारी सलीम डोला (Salim Dola) हा ड्रग्ज सिंडिकेट चालवत असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. या सिंडिकेटनं देशभरातील सात ते आठ राज्यांना मेफेड्रोन (एमसीएटी), म्याऊ म्याऊ आणि आइस सारख्या औषधांचा पुरवठा केला आणि मोठ्या प्रमाणात परदेशातही तस्करी केली. आता, या संपूर्ण नेटवर्कची चौकशी केवळ मुंबई गुन्हे शाखाच नाही तर अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) देखील करत आहे. या ड्रग्ज तस्करीतून मिळणारे पैसे हवाला आणि रिअल इस्टेटद्वारे लाँडर केले जात असल्याचा ईडीला (ED) संशय आहे. मुंबई गुन्हे शाखा लवकरच या सर्वांना समन्स बजावेल आणि त्यांचे जबाब नोंदवेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
