Shefali Jariwala Death Case: 'कांटा लगा गर्ल' म्हणून प्रसिद्ध असलेल्या शेफाली जरीवाला (Shefali Jariwala) हिच्या निधनानं सर्वांनाच धक्का बसला आहे. शेफालीला हृदयविकाराचा तीव्र झटका (Shefali Suffers Severe Heart Attack) आल्यानं तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शेफालीला अखेरचा निरोप देण्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. शेफालीच्या अंत्यसंस्काराचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहेत. असाच एक व्हिडीओ समोर आला हे. ज्यामध्ये पराग त्यागी (Parag Tyagi) शेफालीच्या अस्थी घेऊन विसर्जन करण्यासाठी जातानाचा हा व्हिडीओ आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसतंय की, शेफालीचा पती पराग त्यागी अस्थींचा कलश हातात घेऊन विसर्जनासाठी जात असल्याचं पाहायला मिळंतय. यावेळी तो धायमोकलून रडत असल्याचं दिसतंय. तसेच, त्यानं शेफालीच्या अस्थींचा कलश उराशी कवटाळून ठेवल्याचंही दिसतंय. त्याच्यासोबत त्याचे सासरे आणि शेफालीचे वडीलही दिसत आहेत. याशिवाय, दुसऱ्या व्हिडीओमध्ये पराग त्यागी आणि शेफालीचे वडील, तिची बहीण तिच्या अस्थींचं जुहू बीचवर विसर्जन करत असल्याचं दिसतंय.
शेफालीच्या मृत्यूनंतर पराग त्यागीची अवस्था वाईट
व्हिडीओमध्ये, पराग त्यागी ओशिवरा स्मशानभूमीतून शेफालीच्या अस्थींचा कलश उराशी कवटाळून बाहेर पडताना दिसत आहेत. यावेळी तो खूपच भावूक झाल्याचं पाहायला मिळतंय. त्याच्यासोबत असलेले कुटुंबीय त्याला धीर देत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळतंय.
शेफालीच्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांकडून अजून तपास सुरू आहे. कूपर रुग्णालयात शेफालीचं शवविच्छेदन करण्यात आलं. दरम्यान, आंबोली पोलिस स्टेशनशी संबंधित सूत्रांनी तिच्या मृत्यूशी संबंधित काही महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. पोलीस तपासात असं दिसून आलंय की, शेफाली जरीवाला गेल्या 8 वर्षांपासून अँटी-एजिंग ट्रीटमेंट घेत होती.
'बिग बॉस 13' मध्ये घेतलेली वाईल्ड कार्ड एन्ट्री
शेफाली जरीवालानं 2019 मध्ये बिग बॉस 13 मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती, जिथे ती तिचा एक्स-बॉयफ्रेंड सिद्धार्थ शुक्लासोबत दिसली होती. सिद्धार्थ शुक्ला त्या सीझनचा विनर ठरलेला. त्यानंतर दोनच वर्षांत सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं. सिद्धार्थचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचं सांगितलं जातं.
दरम्यान, 27 जून रोजी रात्री उशीरा शेफाली जरीवालाची प्रकृती बिघडली. त्यावेळी तिचा पती पराग त्यागीनं तिला तात्काळ अंधेरीतील बेलेव्ह्यू रुग्णालयात नेलं. पण, तोपर्यंत फार उशीर झालेला, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. रुग्णालयाच्या स्वागत कर्मचाऱ्यांनी शेफालीला मृत अवस्थेत आणल्याची पुष्टी केली. हिंदुस्थानी भाऊ, पारस छाब्रा, संभावना सेठ, शहनाज गिल यांच्यासह अनेक सेलिब्रिटी शेफालीला अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :