Shashank Ketkar Social Media Post : अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) हा वारंवर चर्चेत येत असतो. त्याच्या कामामुळे तर कधी सोशल मीडियावरील (Social Media) त्याच्या पोस्टमुळे तो लक्ष वेधून घेतो. शशांकने ओटीटीवरही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. पण असं असलं तरीही शशांकची एक पोस्ट सध्या बरीच चर्चेत आलेली आहे. 


सध्या अनेक घडामोडींवर अभिनेता शशांक केतकर हा व्यक्त होत असतो. त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टही यामुळे विशेष लक्ष वेधून घेतात. अशीच एक पोस्ट सध्या शशांकने केली आहे. महाराष्ट्रातल्या नद्यांचं स्वरुप हे दिवसागणिक भीषण होत असल्याचं चित्र सध्या महाराष्ट्रात आहे. त्यावर शशांकने व्यक्त होत पोस्ट केलेली आहे. त्याची ही पोस्ट सध्या बरीच चर्चेत आल्याचं पाहायला मिळतंय. 


शशांकची पोस्ट काय?


शशांकने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत नद्यांविषयी भाष्य केलं आहे. त्यामध्ये दोन फोटो आहेत. त्यामध्ये एका ठिकाणी नदी अत्यंत स्वच्छ दिसतेय. त्यावर कॅप्शन लिहिलेलं आहे की, जो देश नद्यांना नदी म्हणूनच दर्जा देतात. दुसरा फोटोही नदीचाच आहे, पण तिथे खूपच अस्वच्छता असल्याचं पाहायला मिळतंय. त्यावर कॅप्शन लिहिलं आहे की, देश जो नदीची आई म्हणून पूजा करतो. ही पोस्ट शेअर करत शशांकने त्यावर कॅप्शन लिहिलं आहे की, आपण घाबरायची गरज नाही. देव येऊन स्वच्छ करतील. सण महत्त्वाचे... निसर्ग नाही. शशांकची ही मार्मिक पोस्ट सध्याच्या गंभीर परिस्थितीवर भाष्य करणारी आहे.




शशांकचा सिनेप्रवास...


शशांक केतकर हा होणार सून मी ह्या घरची या मालिकेतून घराघरांत पोहचला. या मालिकेत त्याने श्रीरंग गोखले ही भूमिका साकारली होती.  आजही त्याला श्री म्हणूनच प्रेक्षक ओळखतात. त्यानंतर शशांकने अनेक मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्याचप्रमाणे तो 31 दिवस यांसारख्या सिनेमांमधून मोठ्या पडद्यावरही झळकला. गोष्ट तशी गंमतीची या नाटकातून त्यानं रंगभूमीवरही आपली छाप सोडली. त्यानंतर तो ओटीटीवरही दिसला. त्यामुळे मालिका, सिनेमा, रंगभूमी आणि ओटीटी अशा विविध माध्यमातून शशांकने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.  






ही बातमी वाचा : 


Subodh Bhave : 'महाराज' साकारल्यानंतर ट्रोल, ऐतिहासिक भूमिका न करण्याचा निर्णय; सुबोध भावे म्हणाला, 'आपल्या प्रेक्षकांमध्ये ती क्षमताच...'