Sharmila Shinde : सिनेसृष्टीत कायमच नवनवीन बदल होत असतात. तंत्रज्ञानाचा वापर अनेकदा नव्याने वापरला जातो. सध्या जगभरात आर्टिफिशल इंडलीजन्स हे नवं तंत्रज्ञान आलंय. या नव्या तंत्रज्ञानाचा वापर सध्या सिनेसृष्टीतही केला जातोय. रंगभूमी, मालिका, सिनेमे अशा तिन्ही माध्यमांवर हा एआयचा पडगा पाहायला मिळतोय. इतकंच नव्हे तर रसिकांना देखील हे प्रयोग आवडत असल्याचं चित्र आहे. पण यावर अभिनेत्री शर्मिला शिंदे (Sharmila Shinde) हिने आक्षेप घेत एक सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
अभिनेत्री शर्मिला शिंदे हिने तिच्या सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. एआयमुळे तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे, पण यामध्ये माणसाला मात्र मागे सारलं जातंय. त्यामुळे यावर या अभिनेत्रीची तिचा स्पष्ट रागही व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय. अभिनेत्रीने नेमकं काय म्हटलं, त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
शर्मिला शिंदेने नेमकं काय म्हटलं?
शर्मिलाने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हटलं की, 'कृपया एआयचा वापर टाळा आणि हाडा मांसाचे कलाकार कास्ट करा. एआयला फार प्रोत्साहन देऊ नका. कास्टिंग करणाऱ्यांनी थोडे कष्ट घेतले तर एक सारखे दिसणारे कलाकार सापडतील. मी ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा सिनेमा बघितला नाहीये पण कौतुक ऐकलंय की बाबूजींच्या सिनेमामधल्या भूतकाळ आणि वर्तमानातल्या भूमिकांसाठी सुनील बर्वे व आदिश वैद्य यांचं कास्टिंग अगदी चपखल बसलंय.'
तसेच या पोस्टच्या कॅप्शनमध्ये शर्मिलाने म्हटलं की, 'एखाद्या पात्राच तारुण्य किंवा वृद्धावस्था दाखवायला AI कशाला हवय. कला आणि कलाकार अजून जिवंत आहेत.काही विशेष किंवा अपरिहार्य परिस्थितिंमध्ये गर्जेपुर्ता आणि मर्यादित वापर हा तंत्रज्ञानाचा योग्य वापर म्हणून समजला जाऊ शकतो'
शर्मिला सध्या झी मराठीवर नवरी मिळे हिटलरला या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत ती दुर्गा हे पात्र साकारत आहे. तसेच ती लवकरच लाईफ लाईन या सिनेमातून मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, वाडकर, हेमांगी कवी, माधव अभ्यंकर, भरत दाभोळकर, संध्या कुटे यांच्यासोबत झळकणार आहे.