Continues below advertisement

Bollywood’s Upcoming Films Planned as Two-Part Releases: सध्या प्रेक्षकांमध्ये धुरंधर या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाचा पहिला भाग 2025 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा दुसरा भाग 2026मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील तगडी स्टारकास्टने प्रेक्षकांमध्ये भुरळ घातली आहे. आदित्य धर दिग्दर्शित हा चित्रपट दोन भागांत प्रदर्शित होणार. यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्कंठा कायम आहे. चित्रपटातील दुसर्‍या भागांत नेमकं काय दाखवलं जाणार? याबाबत उत्कंठा कायम आहे. आता दोन चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. दोन आगामी बॉलिवूड चित्रपटांचे फिल्ममेकर्सही याच पद्धतीने चित्रपट प्रदर्शित करण्याच्या मार्गावर आहे. यामध्ये संजय लीला भन्साळी यांचा बहुप्रतिक्षित लव्ह अँड वॉर आणि शाहरूख खानचा किंग या चित्रपटांचा समावेश आहे. हे दोन्ही चित्रपट मोठ्या पडद्यावर कधी प्रदर्शित होईल? जाणून घेऊयात.

दोन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनाबाबत उच्चस्तरीय चर्चा

बॉलीवूड हंगामच्या वृत्तानुसार, शाहरूख खान यांचा आगामी किंग आणि संजय लीला भन्साळी यांचा लव्ह अँड वॉर या दोन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनाबाबत उच्चस्तरीय चर्चा सुरू आहे. दोन्ही चित्रपट बिग बजेट सिनेमा आहेत. धुरंधर चित्रपटाच्या यशानंतर, किंग आणि लव्ह अँड वॉरचे फिल्ममेकर्स, चित्रपट दोन भागांत विभागण्याच्या विचारात आहे. हे दोन्ही भाग सहा महिन्यांपैक्षा कमी कालावधीत प्रदर्शित होतील.

Continues below advertisement

रिपोर्ट्सनुसार, लव्ह अँड वॉर हा चित्रपट ऑगस्ट 2026 रोजी प्रदर्शित होईल. तर, दुसरा भाग जानेवारी 2027 पर्यंत प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. तर, शाहरूख खानचा किंग सप्टेंबर 2026 रोजी प्रदर्शित होईल. तर, दुसरा भाग मार्च 2027 पर्यंत प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या दोन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनाबाबत फक्त प्राथमिक चर्चा सुरू आहे. अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. दोन्ही चित्रपटांचे सध्या चित्रीकरण सुरू आहे. धुरंधरच्या यशामुळे या चर्चा फक्त प्राथमिक आहेत. एका भाग प्रदर्शित करायचा की दोन, हे लवकरच स्पष्ट होईल.

धुरंधरचा दुसरा पार्ट कधी प्रदर्शित होईल?

रणवीर सिंह यांचा धुरंधर या चित्रपटाचा दुसरा भाग 19 मार्च 2026 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. किंग आणि लव्ह अँड वॉर या दोन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखांबाबत अद्याप अधिकृत तारीख समोर आलेली नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'दोन पुरूष होते अन् मी कपड्यांशिवाय..' इंटिमेट सीन करतानाचा अनुभव कसा असतो? प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री म्हणाली..