Continues below advertisement

Actress Sayani Gupta Shares Her Experience: सध्या आपण अनेक चित्रपट आणि वेबसिरीजमध्ये इंटिमेट सीन्स पाहिले असतील. जेव्हा प्रेक्षक चित्रपट किंवा वेब सिरीजमधील इंटिमट सीन्स पाहतात, तेव्हा त्यांना या सीन्सच्या संबंधित अनेक प्रश्न पडतात. असे क्षण कसे चित्रीत केले जातात? हे सीन्स शूट करताना कलाकारांना विचित्र वाटत नाही का? इंटिमेट सीन्स शूट करत असताना कलाकारांच्या मनात भीती तयार होत नाही का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निश्चितच येतात. बऱ्याचदा इंटिमेट सीन करत असताना कलाकारांच्या मनात एक दडपण असतं. पण असे सीन शूट करताना सेटवर नेमकं वातावरण कसं असतं? याबाबत अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे. याआधीदेखील अनेक अभिनेत्रींनी इंटिमेट सीन करतानाचा अनुभव शेअर केला आहे. नुकतंच सयानीने इंटिमेट सीन करतानाचा अनुभव शेअर केला आहे.

इंटिमेट सीनबाबत सयानी गुप्ता नेमकं काय म्हणाली?

अभिनेत्री सयानी गुप्ता आपल्या बोल्ड सीन्ससाठी ओळखली जाते. तिनं आतापर्यंत अनेक चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. तिनं ऑनस्क्रीनमध्ये अनेक इंटिमेट सीन्स केले आहेत. तिनं नुकतंच एक मुलाखत दिली. या मुलाखतीतून तिनं इंटिमेट सीन्स नेमके कसे शूट केले जातात? याबाबत भाष्य केले आहे. फिल्मीज्ञानला दिलेल्या मुलाखतीत सयानी म्हणाली, "मी 2 कॅमेऱ्यांसमोर न्यूड झाली होती. सेट पू्र्णपणे बंद होते. सेटवर शूटिंगदरम्यान फक्त आवश्यक क्रू मेंबर्स उपस्थित होते. तसेच फोटोग्राफर डायरेक्टर आणि दुसरा डीपी सेटवर होता. दोघेही पुरूष होते. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान वातावरण आदरयुक्त आणि व्यावसायिक राहिले", असं सयानी गुप्ता म्हणाली.

इंटिमेट सीन्सच्या अनुभवाबाबत सयानी म्हणाली, "इंटिमेट सीन्स करताना सेटवरील वातावरण खूप नियंत्रित होते. जरी बाहेरून इंटिमेट सीन्स चित्रित करताना अस्वस्थ वाटू शकते. परंतु, व्यावसायिकरित्या हाताळले तर, प्रत्यक्षात वास्तव्य खूप वेगळे असते", असं सयानी म्हणाली. तिच्या मते, चित्रपटाचा सेट आपल्या कामाचे ठिकाण आहे. त्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाला त्यांच्या जबाबदाऱ्या समजतात, असं ती म्हणाली. "दोन पुरुषांसमोर नग्न दृश्य चित्रित केले होते. परंतु, कधीही अस्वस्थ वाटलं नाही. इथे वैयक्तिक मर्यादांवर लक्ष न देता, योग्यरित्या सीन चित्रित करण्यावर लक्ष केंद्रीत केले होते", असं सयानी म्हणाली.

अभिनेत्रीच्या करिअरबद्दल सांगायचं झाल्यास, तिनं जॉली एलएलबी 2, जग्गा जासूस, आर्टिकल 15, फॅन यांसाख्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकराली आहे. तिनं आतापर्यंत अनेक वेबसिरिजमध्ये काम केलं आहे. अभिनेत्री सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय असते.