Shahrukh Khan King First Look: सुपरस्टार शाहरुख खान (Shahrukh Khan) गेल्या 2 वर्षांपासून मोठ्या पडद्यावर दिसलेला नाही. त्यानं आधी डंकी चित्रपटात काम केलं होतं. बॉक्स ऑफिसवर (Box Office) डंकी चित्रपटाची जादू फार काही चालली नाही. या सिनेमाला प्रेक्षकांकडून थंड प्रतिसाद मिळाला होता. दरम्यान, आता शाहरुख खान लवकरच आपल्या आगामी प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या (Entertainment) भेटीस येत आहे. त्याचा आगामी अॅक्शन फिल्म या वर्षाच्या अखेरीस म्हणजेच क्रिसमसमध्ये रिलीज होणार आहे. पठान फिल्म दिग्दर्शित सिद्धार्थ आनंद शाहरुख खानचा अपकमिंग फिल्म (Shahrukh Khan Upcoming Film) 'किंग' डायरेक्ट करत असून, या सिनेमातील शाहरुखचा फर्स्ट लूक इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा सिनेमात शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण स्क्रीन शेअर करणार आहे.
मागील वर्षांपासून शाहरुख खान आपल्या आगामी 'किंग' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यात, बेस्ट लोकेशन्समध्ये या सिनेमाची शूटिंग सुरू आहे. सध्या 'किंग' या सिनेमाची शूटिंग साऊथ अफ्रिकेतील केप टाऊनमध्ये सुरू आहे. या ठिकाणी चित्रपटातील गाणं रेकॉर्ड केलं जात आहे. दरम्यान, शाहरुख खानच्या 'किंग' चित्रपटाच्या सेटवरुन अनेक फोटो आणि व्हिडीओ लीक झाले असून, या फोटोतून शाहरुख आणि दीपिकाचा लेटेस्ट लूकही पाहायला मिळत आहे.
'किंग' चित्रपटाच्या सेटवरील व्हिडीओ व्हायरल (Shah Rukh Khan upcoming action film King)
व्हिडीओच्या एका दृश्यात, कोरिओग्राफर गाण्याचे स्टेप्स दाखवत आहे. तर, शाहरुख खान आणि दीपिका हे एकमेकांचा हात पकडून उभे आहेत. तसेच, दुसऱ्या व्हायरल फोटोमध्ये शाहरुख खान एका नारंगी शर्टमध्ये दिसत आहे. तो गाडीमध्ये बसलेला दिसत आहे. याचा व्हिडीओही सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओत हॉलिवूड सिंगर एड शीरनचं रॅप ऐकू येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या सिनेमातील गाणी अनिरुद्धने कंपोज केले आहेत.
'किंग' चित्रपटात शाहरुखच्या लेकीचीही एन्ट्री (SRK Deepika Padukone King film shooting)
दोघांचा शूटिंगदरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. चाहत्यांनी हा सिनेमाचा पाहण्याची उत्सुकता कमेंट सेक्शनमध्ये दर्शवली आहे. या सिनेमात केवळ शाहरुख आणि दीपिका ही जोडी नसून, सुहाना खान, राणी मुखर्जी, अभिषेक बच्चन, सौरभ शुक्ला, जयदीप अहलावत, अरशद वारसी, अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ यांच्या भूमिका आहेत. ही फिल्म 24 डिसेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
