Aaple Sarkar Portal Down: राज्यातील सामान्य जनतेला विविध शासकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे ‘आपले सरकार’ हे वेबपोर्टल (Aaple Sarkar Portal) गेल्या 4-5 दिवसांपासून तांत्रिक अडचणींमुळे बंद आहे. 27 एप्रिलच्या रात्रीपासून या पोर्टलमध्ये बिघाड झाल्याने जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र आणि शिष्यवृत्ती अर्जांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या कामांसाठी नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Continues below advertisement

Aaple Sarkar Portal Down: लाखो नागरिकांची कामे रखडली

दररोज लाखो नागरिक या पोर्टलचा वापर करून विविध दाखल्यांसाठी अर्ज करत असतात. सध्या स्पर्धा परीक्षांचे अर्ज भरण्याची आणि शैक्षणिक प्रवेशांची प्रक्रिया सुरू असल्याने, पोर्टल बंद असल्याचा मोठा फटका विद्यार्थी आणि पालकांना बसला आहे.

Aaple Sarkar Portal Down: मंत्री आशिष शेलार यांची उच्चस्तरीय बैठक

या गंभीर परिस्थितीची दखल घेत इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. तांत्रिक अडचणींचे मूळ शोधण्यासाठी आणि त्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी आयटी तज्ज्ञ, अभियंते आणि तंत्रज्ञान प्रमुखांची एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे.

Continues below advertisement

Aaple Sarkar Portal Down: आंतरराष्ट्रीय कंपन्यांची मदत

प्रणाली केवळ दुरुस्त न करता ती अधिक 'सुरक्षित आणि वेगवान' करण्यावर शासनाचा भर आहे. यासाठी मायक्रोसॉफ्ट (Microsoft), डेल (Dell) आणि कॉमवॉल्ट (Commvault) यांसारख्या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या भारतीय प्रतिनिधींशी समन्वय साधला जात आहे.

"तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी आमची टीम 24x7 काम करत आहे. पोर्टल अधिक सक्षम आणि सुरक्षित बनवून ते लवकरच पूर्ण क्षमतेने सुरू होईल. नागरिकांनी तोपर्यंत संयम राखावा आणि सहकार्य करावे," असे मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले आहे. 

Aaple Sarkar Portal Down: दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात

दरम्यान, समितीने प्राथमिक तपासणी पूर्ण केली असून तांत्रिक सुधारणांचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही दिवसांत हे पोर्टल पुन्हा कार्यान्वित होईल, असा विश्वास विभागाने व्यक्त केला आहे. तोपर्यंत नागरिकांनी आपल्या नजीकच्या सेवा केंद्रांशी संपर्कात राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

LPG Cylinder Price Hike: व्यावसायिक सिलिंडरच्या दरात तब्बल 993 रुपयांची वाढ; 19 किलोच्या सिलिंडरसाठी मोजावे लागणार 3 हजार 71 रुपये, निवडणुका संपताच महागाईचा तडाखा

Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ आजपासून सुरु, कसा आहे प्रकल्प?, रोडचा फायदा काय?, A टू Z माहिती