Seema Sajdeh Breaks Silence on Divorce from Sohail Khan: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि त्याचे तिन्ही भाऊ कायम चर्चेत असतात. सलमान खान अविवाहित आहे. दरम्यान, दोन्ही भावांचा घटस्फोट झाला आहे. सलमान खानचा भाऊ सोहेल खान आणि सीमा सजदेह यांचा 2022मध्ये घटस्फोट झाला होता. दरम्यान, अलिकडेच सीमा सजदेहने सोहेलसोबत विभक्त होण्यामागचं कारण आणि घटस्फोटानंतर जीवन कसे बदलले, हे उघड केले आहे. सीमा सजदेहने वय, वेळ आणि दुरावा यामुळे त्यांच्या नात्यात कसे अंतर वाढू लागले? याबाबत सांगितले. दोघांचे लग्न अगदी कमी वयात झाले, मात्र, लोक काळाबरोबर कसे बदलतात, याबाबात तिनं सांगितले. दोघांमधील घटस्फोट घेण्यामागचं कारण काय? तिनं याबाबत खुलासा केला आहे.
सोहेल अन् सीमा सजदेह यांनी लग्न का मोडलं?
सोहेल खान आणि सीमा सजदेह यांनी 1998 साली लग्नगाठ बांधली. त्यानंतर 2022 साली काडीमोड घेतला. सध्या ते निर्वाण आणि योहान या दोन मुलांचे पालक आहेत. घटस्फोटाबाबत सीमा म्हणाली, "आम्ही जेव्हा लग्न केले. तेव्हा आम्ही खूप लहान होतो. मी 22 वर्षांची होते. आम्ही एकत्र वाढलो. तसतसे आम्ही वेगवेगळ्या दिशेनं जाऊ लागलो. आमचे दृष्टिकोन बदलले. अखेर आम्हाला जाणवलं की, आम्ही पती पत्नीपेक्षा चांगले मित्र आहोत", असं सीमा म्हणाली. "आम्ही दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घाईघाईनं नाही तर, खूप विचार करून घेतला आहे. दु:खी नात्यात एकत्र राहण्यापेक्षा घरात शांतता महत्त्वाची आहे", असं सीमा म्हणाली.
'आम्ही परस्पर संमतीने वेगळे झालो आहोत'
"आम्हा दोघांना घरातील वातावरण खराब करायचे नव्हते. भांडणापेक्षा वेगळे होणे चांगले वाटले. आम्ही परस्पर संमतीने वेगळे झालो आहोत. पण फक्त पती पत्नी म्हणून वेगळे झालो आहोत. आम्ही आजही एक कुटुंब आहोत. तो माझ्या मुलांचा पिता आहे. त्याची जागा कुणीही घेऊ शकत नाही", असं सीमा म्हणाली. "हा टप्पा माझ्यासाठी सोप्पा नव्हता. यातून बाहेर येण्यासाठी प्रचंड वेळ लागला. मी नैराश्यात गेले होते", असं सीमानं स्पष्ट केलं. दोघांच्या घटस्फोटाची प्रचंड चर्चा झाली होती.
