Malad Railway station Murder: मुंबईच्या पश्चिम रेल्वेमार्गावरील गजबजलेल्या मालाड रेल्वे स्थानकात शनिवारी संध्याकाळी आलोक सिंह (Alok Singh) (वय 31) या महाविद्यालयीन प्राध्यापकाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी (RPF Police) आरोपी ओंकार शिंदे (वय 27) याला ताब्यात घेतले आहे. ओंकार शिंदे (Onkar Shinde) याला सध्या बोरिवली येथील रेल्वे पोलिसांच्या मुख्यालयात आणले असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. यादरम्यान या हत्याप्रकरणाला कलाटणी देऊ शकणारी एक नवीनच माहिती समोर आली आहे. (Mumbai murder news)

मालाड रेल्वे स्टेशनवर चाकू हल्ल्यात मयत झालेले आलोक सिंह याचे वडील संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या सुरक्षेमध्ये कमांडो म्हणून तैनात होते. त्यांनी अनेक वर्षे राजनाथ सिंह यांचे सुरक्षारक्षक म्हणून काम केले आहे. आलोक सिंह आणि ओंकार शिंदे हे दोघेही मालाड परिसरातच वास्तव्याला होते. त्यामुळे आरोपी ओंकार शिंदे आणि आलोक सिंह यांच्यात जुना वाद होता का? याच रागातून त्याने आलोक सिंह यांना पोटात चाकू खुपसून ठार मारले का, या पैलूचाही बोरिवली जीआरपी पोलीस अधिक तपास करत आहेत. या चौकशीतून आता काय निष्पन्न होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.  प्रा. आलोक सिंग हे विलेपार्लेतल्या नरसी मोंजी कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये गणिताचे प्राध्यापक होते. 2024 पासून नरसी मोंजी कॉलेजमध्ये ते कार्यरत होते. आलोक सिंग खूप शांत, दयाळू होते. आलोक सिंग कधीच कुणाच्या युक्तिवाद किंवा भांडणात पडत नसत, असं त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले. Mumbai News: मुंबईच्या लोकलमध्ये वाद, मालाड स्टेशनवर शिक्षकाची भोसकून हत्या, 12 तासात आरोपीला बेड्या

मुंबईच्या मालाड रेल्वे स्थानकात शनिवारी सायंकाळी थरकाप उडवणारी घटना घडली होती. इथं एका प्राध्यापकाची  रेल्वे स्थानकावर धारदार शस्त्राने भोसकून हत्या केली होती. या हत्येच्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. लोकलमधून उतरताना झालेल्या एका क्षुल्लक वादाचे रूपांतर भीषण हत्येत झालं होतं. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी वेगाने हालचाली करत मुख्य आरोपीला अटक केली आहे. ओंकार शिंदे असं आरोपीचं नाव आहे.

प्राथमिक माहितीनुसार, मालाड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर शनिवारी प्रवाशांची मोठी वर्दळ होती. यावेळी अलोक सिंह नावाचे प्राध्यापक लोकलमधून उतरत असताना, गर्दीमुळे त्यांचा दुसऱ्या एका प्रवाशाला धक्का लागला. यावरुन दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली. मात्र, रागाच्या भरात असलेल्या आरोपी ओंकार शिंदेनं अलोक सिंग यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. आरोपीने सिंह यांच्या पोटात शस्त्र खुपसल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात हालवण्यात आलं. मात्र, तोपर्यंत दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला.

हल्ला केल्यानंतर आरोपी ओंकार शिंदे गर्दीचा फायदा घेत घटनास्थळावरून फरार झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण रेल्वे परिसरात खळबळ उडाली आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. रेल्वे पोलिसांनी तातडीने तपासचक्रं फिरवली. स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना आरोपीची ओळख पटवली. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा मागोवा घेत त्याला ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपीला सध्या बोरिवली पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून, तिथे त्याची सखोल चौकशी सुरू आहे. आरोपीने हे कृत्य रागाच्या भरात केले की यामागे आणखी काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

आणखी वाचा

धक्का लागल्याचा राग आला, कॉलेज प्रोफेसरला पोटात चाकू खुपसून संपवलं, मालाड रेल्वे स्टेशनवरची धक्कादायक घटना