Sayaji Shinde on Devendra Fadnavis : आमचं गाव मराठी, आमची भाषा मराठी, आमचा जिल्हा मराठी, आमच राष्ट्र मराठी त्यामुळे आमच्या मराठीला पहिलं प्राधान्य देण्यात यावं. तिसरी भाषा असणाऱ्या हिंदीला पाचवी सहावीनंतर शिकवण्यात यावं. मुख्यमंत्री कोणत्या भाषेत शिकले आहेत? एका पक्षाने निर्णय घेतला म्हणून महाराष्ट्रात हिंदी सक्ती करु नये, असं मत अभिनेते सयाजी शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केलं आहे.
महाराष्ट्रात शाळेतील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेल्या हिंदी भाषेच्या सक्तीवरून अभिनेते सयाजी शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी हिंदी भाषा सक्तीचे करणे पूर्णपणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. आज मी जो कोणी आहे, तो माझ्या मराठी मातृभाषेमुळे आहे. माझ्या गावाची जिल्ह्याची राज्याची भाषा मराठी असताना हिंदी भाषा लहानपणापासून सक्तीची कशासाठी? मी मराठीचा ग्रॅज्युएट असून मराठीतून शिक्षण घेतले आहे. मराठी इतके समृद्ध वाङमय इतर कोणत्या भाषेत नाही.... पाच सहा वर्षाच्या मुलाला मराठीची शब्दरचना वाक्यरचना समजून घेण्याच्या आधी त्याच्यावर हिंदी लादणे कशासाठी हे धोरण चुकीच आहे...जरी हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असलं तरी मला हे पटत नाही. या गोष्टीला गावामध्ये सर्वांनी विरोध करायला हवा.. ही सक्ती पाचवी सहावी सातवी नंतर करा, असंही सयाजी शिंदे यांनी नमूद केलं.
सयाजी शिंदे म्हणाले, मी बारा भाषेत काम करतो. मात्र लिहून घेताना ते मराठीत घेतो. मग ते समजून घेतो... ज्या मातृभाषेत आपण शिकतो त्याच मातृभाषेने आपण विचार करतो. ही हिंदी भाषा लागून त्याचे भजे करू नका. मुख्यमंत्री असो किंवा भाषाशास्त्राचे अभ्यासक पण सर्वांना नम्र विनंती हे धोरण मागे घ्या..हिंदी भाषेच्या सक्तीबाबत मराठी कलाकार समोर जरी येत नसले तरी मी त्यांच्या वतीने प्रतिनिधी म्हणून मी बोलतो. हिंदी भाषेची सक्ती नको. भारतात मराठी भाषा श्रेष्ठ आहे. सध्या जिल्हा परिषद शाळांची खूप वाईट स्थिती आहे.... लहानपणी आम्हाला देखील इंग्लिश येत नाही म्हणून हिणवलं जायचं.... पण माझा एटीट्यूड वेगळा होता.. मराठीने सुद्धा आपल्या ग्रामीण भाषेची वाट लावली..साठ वर्षांपूर्वी माझ्या आई-वडिलांनी जे मला शिकवलं ते मला आता योग्य वाटतं. त्यांच्याकडे शील अश्लीलता नव्हती. जातीपातीतले भेद नव्हते... अलीकडे इंग्रजी भाषेमुळे हे सर्व बदलत गेलं..
पुढे बोलताना सयाजी शिंदे म्हणाले, घटनेनुसार हिंदी भाषा राष्ट्रभाषा नाही एखाद्या पक्षाचा तो अजेंडा असू शकतो. घटनेनुसार मुख्य 18 भाषा या राष्ट्रभाषा आहे. ज्याने त्याने आपल्या राज्य भाषेला आदर द्यायला हवा पण तो लादायला नको. मुख्यमंत्री नेमके कोणत्या भाषेत शिकलेत हे मला समजत नाही मराठीतच शिकलेत ना? त्यांनी मराठी भाषेला प्राधान्य दिलं पाहिजे तिसरी सक्तीची भाषा नको.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ही प्रतिभा दुसऱ्या कोणाकडेही नाही, तो त्याच्या आवाजाने बरे करायचा आजार! रियाज करताना मृत्यूने गाठलं