Saurabh Goukhale on Ganesh Visarjan miravnuk : अनंत चतुदर्शीचा दिवस उजाडून गेला तरी अजूनही पुण्यासह मुंबईतील अनेक गणपती बाप्पांचं विसर्जन (Ganesh Visarjan miravnuk) झालेलं नाही. डीजेच्या दणदणाटासह राज्यात अजूनही मिरवणुका सुरु आहेत. मिरवणुकांमध्ये डीजेचा दणदणाट सुरु असल्याने पारंपरिक वाद्य वाद्य वाजवणाऱ्या कलावंतांना त्यांची कला देखील सादर करता येत नाहीये. अभिनेता सौरभ गौखले (Saurabh Goukhale) याने याबाबतचे काही अनुभव शेअर केले आहेत.
सौरभ गोखले म्हणाला, नमस्कार.. आज गणेश विसर्जनाचा दिवस आहे. मला अत्यंत वाईट अनुभव आलाय. मी कलावंत पथकाचा एक सदस्य आहे. आम्ही आज मार्केट यार्ड गणेश मंडळासोबत वादंग करणार होतो. आमची संध्याकाळी सहा वाजताची मिरवणूक होती. आम्ही बातम्यांमधून चांगली गोष्ट ऐकत होतो. लक्ष्मी रोडची मिरवणूक अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने चालली आहे. विसर्जन अत्यंत वेळेत होत आहेत. मात्र, आम्हाला उलट अनुभव आले आहेत. आमची सहाची मिरवणूक होती, वादनासाठी तयार होती. मात्र, टिळक रोडला चाललेला डीजेचा धुमाकूळ आणि न सरकणारी मिरवणूक याच्यापुढे सगळी मंडळं हतबल झाली. मार्केट यार्ड मंडळ देखील अत्यंत हतबल झालं होतं. त्यांनी सर्वोतोपरी प्रयत्न केले. पण शेवटी डीजेपुढे आम्हाला झुकावं लागलं. कर्णकर्कश्य आवाजात रममाण झालेली लोकं पाहून आम्ही वादंग न करण्याचा निर्णय घेतला.
कलाट्रस्ट पथकाची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल
एक खेदजनक अनुभव !! कलावंत पथकाला मार्केट यार्ड गणेशोत्सव मंडळाने विसर्जन मिरवणुकीसाठी आमंत्रित केलं.. त्याप्रमाणे पूर्ण पथक ठरल्या वेळी सायंकाळी ६ वाजता वादनासाठी तयार असून आणि मंडळाने सर्वतोपरी प्रयत्न करूनही टिळक रोड वरील विसर्जन मिरवणूक एक इंचही पुढे न सरकल्याने ठीक रात्री 9 वाजता असलेल्या जागी एक गजर करून, ध्वजवंदन करून वादनास विराम देण्याचा निर्णय घ्यावा लागला..आम्हाला उत्सुकतेने पहावयास आलेल्या चाहत्यांचा हिरमोड झाला त्याबद्दल क्षमस्व !! आता भेटूया पुढच्या उत्सवात !! गणपती बाप्पा मोरया !! --कलावंत व्यवस्थापन
इतर महत्त्वाच्या बातम्या
अभिनेत्री मानसी नाईकच्या घटस्फोटीत पतीचा भीषण अपघात; ओला कारने दिलेल्या धडकेत रिक्षाचा चुराडा