Actor Astad Kale on Pratap Sarnaik bought Tesla car for grandson : मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वी 60 ते 70 लाखांची टेस्ला कार खरेदी केली. यावेळी प्रताप सरनाईक यांनी ही कार आपल्या नातवासाठी खरेदी केली असल्याचं सांगितलं होतं. दरम्यान, आता मराठमोळा अभिनेता अस्ताद काळे याने प्रताप सरनाईक यांना काही सवाल केले आहेत. त्याने इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून प्रताप सरनाईक यांच्यावर भाष्य केलंय? (Actor Astad Kale on Pratap Sarnaik)
अभिनेता आस्ताद काळे याची पोस्ट जशीच्या तशी
त्या नातवासाठी घेतलेल्या नवीन TESLA रूपी खेळण्याची किंमत किती आहे हो काका??आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या, कर भरणाऱ्या तरीही खड्ड्यांमधून आमच्या कष्टाच्या पैशातून घेतलेली वाहनं चालवावी लागणाऱ्या आमच्यासारख्या नागरिकांच्या जीवाची किंमत किती आहे हो काका?
ता.कः-
1) एवढा पैसा आला कुठून काका?2) तुमच्या लाडक्या नातवाला ते खेळणं घोडबंदर रस्त्यावरून न्ययला सांगा ना. बाकी लाल दिव्यांचा ताफा बरोबर न घेता. (Actor Astad Kale on Pratap Sarnaik)
कार खरेदी केल्यानंतर प्रताप सरनाईक काय म्हणाले?
प्रताप सरनाईक म्हणाले, माझा यामध्ये दुसरा विचार आहे. आम्ही या गाड्या घेऊ शकतो. म्हणजे अशा गाड्या घेऊ शकतील, अशा पालकांना मी सांगत आहे. लहानपणापासून जरं मुलं या गाडीने शाळेत गेले तर इतर मुलांमध्ये जनजागृती होईल. भविष्यात जास्तीत जास्त पर्यावरण पूरक गाड्या रस्त्यावर येतील. भारतातील सर्वात पहिली टेस्ला कार विकत घेता आली याचा मला अभिमान आहे. महत्वाचे म्हणजे ही कार कोणतीही सूट न घेता पूर्ण पैसे भरून मी विकत घेतली आहे. ही कार मी माझ्या मुलाला नाही तर माझा नातवाला देत आहे, कारण तो शाळेत ही कार घेऊन जाईल आणि सर्वांना पर्यावरण पूरक कारचा संदेश देईल. (Actor Astad Kale on Pratap Sarnaik)
इतर महत्त्वाच्या बातम्या
अभिनेत्री मानसी नाईकच्या घटस्फोटीत पतीचा भीषण अपघात; ओला कारने दिलेल्या धडकेत रिक्षाचा चुराडा