Marathi actor : पुणे महानगरपालिकेकडून सध्या अनधिकृत पब्स आणि बारवर कारवाई करण्यात येत आहे. पुण्यात (Pune) सलग चौथ्या दिवशीसुद्धा महापालिकेकडून ही कारवाई करण्यात आलीये. आतापर्यंत बाणेर, बालेवाडी, कल्याणीनगर, वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोरेगाव पार्क इथे पोलिसांकडून कारवाई करण्यात आलीये. मागील काही दिवसांपासून पुण्यात सुरु असलेल्या आम्ली पदार्थांच्या विक्रीच्या घटना समोर येत आहे. या सगळ्यावर आता मराठी अभिनेत्याने (Marathi actor) पोस्ट केली आहे.
अभिनेता सौरभ गौखलेने त्याच्या सोशल मीडियावर पुण्यातील अनधिकृत कारवाईवर भाष्य केलं आहे. त्याच्या या मार्मिक पोस्टची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे.
सौरभने त्याच्या पोस्टमध्ये काय म्हटलं?
सौरभने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं की, शहरातील अनेक ईल-लीगल पब्स आणि बार्सवर महापालिकेची कारवाई!!! पण हेअनधिकृत बार आणि पब बांधू देऊन इतकी वर्ष ज्यांनी मोकाट चालू दिले त्या जादूगारांचा कौतुक सोहळा कधी? असा सवाल त्याने उपस्थित केला आहे.
पुण्यात मागील काही दिवसांपासून तरुण ड्रग्जचे सेवन करत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. त्यानंतर पुणे पोलिसांकडूनही कारवाईचा धडका सुरु करण्यात आला आणि आतापर्यंत 8 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पुण्यातील तरुणाई यासगळ्यामुळे बरबाद होत असल्याचं चित्र सध्या आहे. त्यामुळे महापालिकेकडून बार आणि पबवर कारवाईंचा बडगा उगारण्यात येतोय.
पुण्यात कायद्याचं राज्य राहिलंय का?
पुण्यातील गजबजलेल्या एफ सी रोडवरील एल थ्री लाउंज मधील पार्टीत ड्रग्ज पार्टीने मोठी खळबळ उडाली. हडपसरमधील कल्ट नावाच्या पबमधे त्यांनी रात्री साडेबारा वाजेपर्यंत पार्टी केली आणि पुढे पहाटेपर्यंत पार्टी करण्यासाठी ते एफ सी रोडवरील एल थ्री लाउंज मध्ये पोहोचले आणि पार्टी केली. हा प्रकार समोर आल्यानंतर पुण्यात कायद्याचं राज्य राहिलंय का? विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्याला आता ड्रग्जमाफियांनी ताब्यात घेतलंय का? पुण्याला ड्रग्जच्या नशेबाजांचा विळखा पडलाय का? आणि पुण्यात कायदा-सुव्यवस्था नावाची गोष्ट औषधाला तरी उरलीय का? असे संतप्त सवाल आता पुणेकर विचारू लागलेयत पुण्यात सुरू असलेला ड्रग्ज पार्ट्यांचा सुळसुळाट आहे.
ही बातमी वाचा :
Sanskruti Balgude : मराठी सिनेसृष्टीत पुरुष वर्चस्ववादी मानसिकता आहे का? संस्कृती बालगुडे म्हणाली...