Sardaar Ji 3 Controversy: 'सरदारजी 3' (Sardaar Ji 3) या पंजाबी चित्रपटावरून (Punjabi Movie) गोंधळ सुरू आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून दिलजीत दोसांजचा अभिनेता ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी असूनही, पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर 'सरदारजी 3'मध्ये दिसणार आहे. अशा परिस्थितीत, FWICE नं दावा केला आहे की, जर हा चित्रपट प्रदर्शित झाला तर दिलजीत दोसांजवरही बंदी घातली जाऊ शकते.
फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजचे अध्यक्ष बी.एन. तिवारी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, "आम्ही आधीच सेन्सॉर बोर्डाला पत्र लिहिलं होतं की, हा चित्रपट सेन्सॉर करू नये. कारण त्यात फक्त हानिया आमिरच नाही तर चित्रपटात इतर तीन-चार पाकिस्तानी कलाकार आहेत, ज्यामुळे हा एक मोठा मुद्दा बनला आहे. पण, आम्ही ऐकलं आहे की, ते भारताबाहेर कुठेतरी हा चित्रपट प्रदर्शित करत आहेत. जर त्यांनी असं केलं तर आम्ही त्यांच्यावर आणि त्यांच्या निर्मात्यावर कायमची बंदी घालू."
"दिलजीत दोसांज दुसऱ्या कुठल्याच सिनेमात काम करू शकणार नाही..."
FWICE नं पुढे म्हटलंय की, "व्हाइट हील प्रोडक्शन कंपनी आहे आणि स्वतः दिलजीत दोसांज दुसऱ्या कुठल्याही फिल्ममध्ये काम करू शकणार नाहीत. दुसऱ्या प्रोड्यूसरसोबत त्यांच्या येणाऱ्या फिल्म्स आहेत, त्या सर्वांना मी पत्र लिहिणार आहे. कारण नेशन फर्स्ट हा आमच्या फेडरेशनचा सिद्धांत आहे. आपण त्यापासून मागे हटू शकत नाही. पहलगाममध्ये जेव्हा हल्ला झाला, तेव्हा केवळ ते लोकच मरण पावले नाहीत, तर वाचलेल्यांच्या कुटुंबातील अनेक लोक आज दररोज मरतायत."
दिलजीत दोसांजला सांगितलं 'देशद्रोही'
फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजचे अध्यक्ष बी.एन. तिवारी पुढे बोलताना म्हणाले की, "जर ते सिनेमा पाकिस्तानात किंवा परदेशात प्रदर्शित करण्यास तयार असतील, तर ते आमच्यासाठी देशद्रोही आहेत. केवळ फेडरेशनच नाही तर संपूर्ण भारत अशा लोकांच्या विरोधात असला पाहिजे आणि मी गृह मंत्रालयाकडून आयबी मंत्रालयाला यासाठी पत्र पाठवेन. हे पत्र पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाईल आणि सांगेल की, केवळ पैशासाठी देशाशी खेळणाऱ्या अशा निर्मात्यांचे भारतात अजिबात स्वागत केलं जाणार नाही."
पुढे बोलताना तिवारी म्हणाले की, "वो (दिलजीत दोसांज) हिंदुस्तानातील कोणत्याही फिल्ममध्ये काम करणार असतील, बॉर्डर फिल्मसाठीही आम्ही पत्र लिहिणार आहोत, कारण आम्हाला हे सजमलंय की, ते जे काही करत आहेत, ते चुकीचं आहे."
"इंडस्ट्रीत राहायचं असेल तर तुम्हाला हिंदुस्तानाचे नियम..."
स्टेटमेंटमध्ये पुढे म्हटलंय की, "असं झालं तर ते कुठेच गाणं गाऊ शकणार नाही, ना गाणी रिलीज केली जातील आणि ना कोणत्याही फिल्ममध्ये काम करू शकतील. आक्षेप घेण्याचा अर्थ असा नाही की, आम्हाला त्या चित्रपटावर काही आक्षेप आहे. तुम्ही आमच्या पत्राला विरोध करत आहात आणि भारतात सेन्सॉर न करता चित्रपट परदेशात प्रदर्शित करत आहात. मला कळलं आहे की, दिलजीत दोसांज देखील या चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक आहे. त्यामुळे मनमानी सहन केली जाणार नाही. जर तुम्हाला चित्रपटांमध्ये काम करायचं असेल आणि इंडस्ट्रीत राहायचं असेल तर तुम्हाला भारताचे नियम पाळावे लागतील. तुम्ही देशभक्त असलं पाहिजे."
दिलजीत दोसांजला बॉयकॉट करण्याची मागणी
FWICE चे चीफ अडव्हायझर आणि फिल्म मेकर अशोक पंडित यांनीही दिलजीत दोसांजला बॉयकॉट करण्याची मागणी केली आहे. त्यांनी दिलजीत दोसांजला माफी मागण्याचा सल्ला दिला आहे आणि दावा केलाय की, जर त्यांनी असं नाही केलं, तर त्यांच्यासोबत काम करणं असो किंवा पाकिस्तानसोबत बोलणं, आमच्यासाठी दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :