Sara Tendulkar: क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याची लेक सारा तेंडुलकर ही कायमच चर्चेत असते. कधी सोशल मीडियावरील व्हिडीओमुळे, कधी वैयक्तिक आयुष्यामुळे, तर कधी डेटिंगच्या चर्चांमुळे. पण यावेळी सारा तेंडुलकर चर्चेत आली आहे ती तिच्या मराठी भाषेमुळे. पहिल्यांदाच सारा अस्सल मराठीत बोलताना दिसलीय. मला एकच गोष्ट मराठीत शेअर करायचीय असं म्हणत सांगितलेल्या एका प्रसंगाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तिच्या या व्हिडीओने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

Continues below advertisement

अलीकडेच नववर्षाचं स्वागत करण्यासाठी सारा तेंडुलकर गोव्यात गेली होती. याच ट्रिपमधील एका व्हिडीओमुळे ती चर्चेत आली होती. व्हिडीओमध्ये साराच्या हातात बिअरची बाटली दिसत असल्याने काही नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली होती, तर काहींनी तिच्या खासगी आयुष्याचं समर्थन केलं होतं. याआधी सारा आणि क्रिकेटपटू शुभमन गिल यांचं नाव एकत्र जोडलं जात होतं. मात्र, या चर्चांवर दोघांनीही कधीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही.

अस्सल मराठीत सांगितला खास क्षण...

दरम्यान, सध्या सारा तेंडुलकरचा एक वेगळाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सारा थेट मराठीत बोलताना दिसतेय. क्वचितच मराठीत संवाद साधणारी सारा यावेळी आपल्या आयुष्यातील एक खास स्वप्न उघड करताना दिसली.

Continues below advertisement

सारा म्हणाली, “मी लहान असताना माझी आजी मला छोट्या छोट्या सोन्याच्या वस्तू घ्यायची. कानातले, चेन अशा गोष्टी ती मला भेट द्यायची. तेव्हापासूनच माझ्या मनात एक इच्छा होती की मोठी झाल्यावर मी स्वतःच्या कमाईतून आजीसाठी काहीतरी खास घेईन. आणि आज माझं ते स्वप्न पूर्ण झालं आहे.” असं म्हणत तिने आभार मानले.

एका ज्वेलरी शोरूमच्या उद्घाटनासाठी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) उपस्थित होती. याच कार्यक्रमात ती मराठीत बोलताना दिसली. अनेक दिवसांनंतर सारा मराठी बोलताना दिसल्याने चाहत्यांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, तेंडुलकर कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याच्या लग्नाची तारीख ठरल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच अर्जुनने आपल्या बालपणीच्या मैत्रीण सानियासोबत साखरपुडा केल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे सचिन तेंडुलकर यांच्या घरी सध्या लग्नीनघाई पाहायला मिळत आहे.