Tilak Varma OUT India vs New Zealand T20I Series : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज तिलक वर्मा याच्या फिटनेसबाबत बीसीसीआयने अधिकृत अपडेट देत वाईट बातमी दिली आहे. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेतील पहिल्या 3 सामन्यांतून तिलक वर्मा बाहेर झाला आहे. त्यामुळे तो पुढे नेमका कधी भारतीय संघात पुनरागमन करेल, याबाबत सध्या अनिश्चितता असून टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील त्याच्या सहभागावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
7 जानेवारीला झाली सर्जरी, प्रकृती स्थिर
बीसीसीआयने 8 जानेवारी रोजी तिलक वर्माबाबत अधिकृत माहिती दिली. बोर्डाच्या माहितीनुसार, 7 जानेवारी रोजी राजकोटमध्ये तिलक वर्मावर पोटाच्या समस्येसाठी शस्त्रक्रिया (सर्जरी) करण्यात आली. गुरुवारी सकाळी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून, शुक्रवारी ते हैदराबादला रवाना होणार आहेत. सध्या तिलकची प्रकृती स्थिर असून त्याच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. जखम पूर्णपणे भरून येईपर्यंत आणि डॉक्टरांची परवानगी मिळेपर्यंत तो फिजिकल ट्रेनिंग सुरू करणार नाही. पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतरच तो हळूहळू स्किल-बेस्ड ट्रेनिंगकडे वळेल.
पहिल्या 3 टी-20 सामन्यांतून बाहेर
BCCI च्या अपडेटनुसार, न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या 3 टी-20 सामन्यांत तिलक वर्मा उपलब्ध असणार नाही. बीसीसीआयच्या निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, लक्षणे पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर आणि जखम भरून आल्यानंतरच तिलक पुन्हा शारीरिक सराव सुरू करू शकतील. त्यानंतर तो हळूहळू स्किल ट्रेनिंगकडे वळतील. तसेच, न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या तीन टी-20 सामन्यांमध्ये तिलक वर्मा खेळू शकणार नाहीत. उर्वरित दोन टी-20 सामन्यांसाठी त्यांची उपलब्धता सराव आणि स्किल ट्रेनिंगदरम्यान झालेल्या प्रगतीच्या आधारे ठरवली जाईल.
टीम इंडियासाठी मोठी चिंता
न्यूझीलंडविरुद्धची 5 सामन्यांची टी-20 मालिका आगामी टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. अशा वेळी तिलक वर्मासारख्या फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूचा सुरुवातीच्या सामन्यांमध्ये अभाव टीम इंडियासाठी नक्कीच चिंतेचा विषय ठरणार आहे.
तिलक वर्माचा पर्याय कोण?
सध्या बीसीसीआयने केवळ पहिल्या 3 सामन्यांसाठी तिलक बाहेर असल्याची माहिती दिली असली, तरी तो वेळेत फिट झाला नाही तर बोर्डाला त्याचा पर्याय शोधावा लागू शकतो. क्रिकेट वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार, श्रेयस अय्यर किंवा रियान पराग यांच्यापैकी एकाला तिलकच्या जागी संधी दिली जाऊ शकते.
हे ही वाचा -
