Santosh Juvekar: अभिनेता संतोष जुवेकर कायमच कुठल्या ना कुठल्या गोष्टीमुळे चर्चेत असतो. छावा सिनेमात अक्षय खन्नाच्या भूमिकेवरून त्याने केलेल्या वक्तव्यामुळे तो या आधीच ट्रोल झाला होता. सोशल मीडियावर त्याचे अनेक मीम व्हायरल होत होते. पण सध्या त्याच्या एका पोस्टमुळे चर्चेत आला आहे. नवीन वर्षाच्या मुहूर्तावर अभिनेता संतोष जुवेकर याने नवीन गाडी खरेदी केल्याची गुड न्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली. पण सोशल मीडियावर त्याच्या गाडीचा कौतुक सोडून नेटकरी त्याला ट्रोल करतानाच दिसतायत.
Santosh Juvekar: देखोना Guyss देखोना .. संतोष जुवेकरची पोस्ट
नवीन वर्षात नवीन गाडी घेतली रे महाराजा! असं म्हणत संतोषने आपला आनंद सोशल मीडियावर व्यक्त केलाय. अभिनेता लिहितो, “देखोना Guysss देखोना आईबाबा आणि साईबाबांच्या आशीर्वादाने याचबरोबर तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळे आणि शुभेच्छांमुळे या नवीन वर्षात नवीन पेटीपॅक गाडी घेतली महाराजा… आता प्रवासही नव्याने सुरु! चांगभलं! बाप्पा मोरया…”संतोषच्या घरी थार रॉक्स या गाडीचं आगमन झालेलं आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये संतोषने Thar Roxx असा हॅशटॅग सुद्धा दिलाय.
या पोस्टवर अनेकांनी संतोषचं अभिनंदन केलं आहे. पण अनेकांनी त्याला ट्रोल करायलाही सुरुवात केल्याचं दिसतंय. " आता तरी रहमान डकैतला गाडीचा एक राऊंड मारून आण", "मी बघितलं पण नाही तिकडे ..मी बघूच शकत नाही " असं म्हणत नेटकरी त्याची खिल्ली उडवताना दिसतात.
संतोषच्या गाडीची किंमत किती?
संतोषने घेतलेल्या थार रॉक्स या गाडीची सध्याची किंमत 13 ते 23 लाखांच्या घरात आहे, अशी माहिती फायनान्शियल एक्सप्रेसने दिलीये. संतोषने नवीन गाडी खरेदी केल्याच्या पोस्टवर चाहत्यांसह मराठी कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव तर केला आहेच. पण अनेकांनी त्याला ट्रॉलही केलंय.एकाने लिहिलेय,'स्ट्रगलरचा स्ट्रगल संपलेला दिसतोय..." मोराचा पिसारा फुललेला दिसतो लोकांना .. "
दरम्यान, त्याच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो सध्या ‘घाशीराम कोतवाल’ या हिंदी नाटकात काम करत आहे. अलीकडेच तो ‘स्मार्ट सुनबाई’ या सिनेमात सुद्धा झळकला होता. 'मोरया’, ‘झेंडा’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्याने काम केलं आहे. आता 2026 मध्ये संतोष कोणकोणत्या प्रोजेक्टमध्ये झळकणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे.