Santosh Juvekar : दहीहंडीचा सण आज (19 ऑगस्ट) राज्यभरात मोठ्या उत्साहानं साजरा केला जात आहे. विविध मंडळांकडून दहीहंडी उत्सवात लाखोंच्या बक्षीस देण्यात येतात. राज्यभरात दोन वर्षानंतर 'ढाक्कुमाकुम'चा सूर उमटू लागला आहे. गोविंदा पथकं अनेक महिने मानवी मनोरे लावण्यासाठी सराव करत असतात. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता संतोष जुवेकरनं (Santosh Juvekar) नुकतीच खास पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.
संतोषची पोस्ट:
संतोष जुवेकरनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये गोविंदा पथक थर रचताना दिसत आहेत. या व्हिडीओला संतोषनं कॅप्शन दिलं, 'दोन दिवसांवर गोपाळ अष्टमी आलीये. गेली दोन वर्ष हा गोपाळ काला उत्सव साजरा करता नाही आला कारण covid च संकट तीव्र प्रमाणात होत पण ह्या वर्षी ह्या उत्सवाचा जोर आणि जोश काही औरच असणार आहे सगळेच गोपाळ आणि गोपिका दही हंडी फोडण्याची जोरात तयारी करतायत कस्सून सराव चालाय. कालच माझे खूप जवळचे मित्र श्री मनोज चव्हाण दादानं मुळे महाराष्ट्रातल गाजलेल्या जय जवान गोविंदा पथक जोगेश्वरी (मुंबई) यांची प्रॅक्टिस बघण्याची संधी मिळाली क्या बात मित्रांनो आणि मैत्रिणींनो जोमात अहात सगळे तुम्ही. एक क्षण वाटलं आपण पण घुसावं पण इतकं सोप्प नाही ते लगेच जाणवलं. माझ्या तुम्हाला आणि सगळ्या गोविंदा पाथकांना खूप खूप शुभेच्छा आणि एक विनंती मित्रांनो कृपया करून स्वतःची आणि तुमच्या सोबत येणाऱ्या मुलींची आणि लहान मुलांची काळजी घ्या दही हंडी हा सण आहे आपला तो सणा सारखाच साजरा करा त्याची स्पर्धा करू नका.जोश असुदे पण सोबतीला होशही असूदेत. बाकी आपले #maharashtrapolice आहेतच आपल्या मदतीला आणि आवलीगीरी करणार्यांना फटके द्यायला. मज्जा करा आणि काळजी घ्या रे'
संतोषनं अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. त्याच्या मोरया आणि झेंडा या चित्रपटांना विशेष पसंती मिळाली. तसेच एक थी बेगम या वेब सीरिजमध्ये देखील संतोषनं महत्वाची भूमिका साकारली.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: