Santosh Juvekar : अभिनेता संतोष जुवकेर (Santosh Juvekar) हा लवकरच छावा सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अभिनेता विक्की कौशल हा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे आता मराठमोळा अभिनेता लवकरच बॉलीवूडमध्ये झळकेल. छावा हा सिनेमा छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित आहे. या सिनेमात विक्की कौशल ही संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. 


याचदरम्यान अभिनेता संतोष जुवेकर याने जात धर्म या विषयावर परखड भाष्य केलं आहे. तसेच महाराजांचे विचार आधी घ्या, असंही त्याने म्हटलं आहे. मोरया, झेंडा या सिनेमांच्या माध्यमातून संतोष अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. त्यातच आता तो एका बॉलीवूड सिनेमातून मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. 


'जात, धर्म याच्या पलिकडेही आता जा'


संतोषने नुकतीच इसापनीती या युट्युब चॅनलला मुलाखत दिली. यामध्ये संतोषने जात धर्म यांसारख्या विषयावर त्याची परखड मतं मांडली आहे. त्यामध्ये त्याने म्हटलं की, उद्या जर मी माझ्या एखाद्या मुस्लिम मित्राच्या घरी गेलो आणि त्याच्याकडे पुरणपोळी मागितली तर तो मला ती देईल. तो माझ्या घरी आला आणि त्याने बिर्याणी मागितली तर मीही त्याला ती देईन. असंच जर माझ्या एखाद्या कॅथलिक मित्राच्या घरी गेलो आणि त्याला साबुदाण्याची लापशी मागितली तर तीही तो मला देईल आणि माझ्याघरी त्याने केक मागितला तर तो मी त्याला देईन. त्यामुळे आता आपण जात, धर्म या सगळ्याच्या पलिकडे जायला हवं.                                                                


पुढे संतोषने म्हटलं की, आपल्याला शिवाजी महाराजांनीही हेच सांगितलं. त्यामुळे नुसती दाढी वाढवून, चंद्रकोर लावून, ती भिकबाळी घातली म्हणजे तुम्ही महाराजांचे मावळे नाही झालात, त्यासाठी आधी त्यांचे विचार तुम्ही घ्या.  






ही बातमी वाचा : 


Dakshata Joil : मुंबईच्या पावसातला 'तो' प्रसंग कधीच नाही विसरणार, 'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेत्रीने सांगितला अनुभव