Dakshata Joil :  मुंबईतल्या पावसात अशा अनेक घटना घडतात, ज्या प्रत्येकाच्या आयुष्यात कायमच्या लक्षात राहतात. असाच एक अनुभव झी मराठी वाहिनीवरील 'सारं काही तिच्यासाठी' (Saara Kahi Tichyasathi) या मालिकेतील अभिनेत्रीला आला आहे. सारं काही तिच्यासाठी या मालिकेत अभिनेत्री दक्षता जोईल (Dakshata Joil) ही निशिगंधा ही भूमिका साकारत आहे. 


सारं काही तिच्यासाठी या मालिकेतून दक्षता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. याआधी दक्षता सन मराठी वाहिनीवरील एका मालिकेत झळकली होती. पण निशीगंधाची भूमिका ही प्रेक्षकांना जास्त भावल्याचं पाहायला मिळत आहे. पण मुंबईच्या पावसात दक्षताला एक भयानक अनुभव आला होता. तो किस्सा नुकताच दक्षताने शेअर केला आहे. 


दक्षताने सांगितला 'तो' भयानक किस्सा


दक्षताने तिचा हा अनुभव शेअर करताना सांगितलं की, 'मी अकरावीमध्ये होते. तेव्हा घरी जात असताना प्रचंड पाऊस वाढला. मी पार्ल्यातून घरी जायला निघाले. मी लोकांच्या पाऊलावर पाऊल ठेवून  तो रस्ता पार करायची कसरत सुरु केली. माझं कॉलेज सुरु होऊन एक आठवडाच झाला होता मला कळत नव्हतं की काय करू कसा तो तुंबलेले रस्ता पार करू, पाण्याचा प्रवाह लाटांसारखा येत होता.  मी एका ताई सोबत थांबले कारण नाले उघडे होते आणि मला खूप भीती वाटत होती.  मी कशीतरी माझ्या बाबांपर्यंत पोहोचले जे तिथे एका कामानिम्मित आले होते आणि आम्ही रात्री 2 वाजता घरी पोहचलो.' 


कोकणातला पाऊस मला फार आवडतो - दक्षता


दरम्यान दक्षताला कोकणातला पाऊस फार आवडतो. त्यावर दक्षताने म्हटलं की, 'पावसाळा मला प्रचंड आवडतो असं नाही, मला हिवाळा आवडतो. पावसाळा का नाही आवडत ह्याच मुख्य कारण मुंबईचा पाऊस, म्हणजे एकतर चिखल त्यात कामानिम्मित कुठे बाहेर जायचं असेल तर रस्ते तुंबलेले, वाहतूक विस्कळीत झालेली असते. पण मला कोकणातला पाऊस फार आवडतो माझं गाव आहे तिथे, पाऊसात मस्त लाल मातीचे रस्ते, तो मातीचा सुगंध, हिरवीगार झाडं. खळ्यात छान बसलोय आणि समोर पाऊस पडतोय, हा नुसता संवादच मला आनंद देऊन जातो.'


ही बातमी वाचा : 


Albattya Galbattya  : स्वातंत्र्यदिनी ‘अलबत्या गलबत्या’ रंगभूमीवर करणार विश्वविक्रम, शिवाजी मंदिरमध्ये रंगणार सलग सहा प्रयोग