Bigg Boss Marathi Season 6: 'बिग बॉस मराठी'चा (Bigg Boss Marathi) सहावा सीझन चांगलाच रंगात आला आहे. घरात दिवसेंदिवस नवी समीकरणं आणि रणनीती पुढे येताना दिसतेय. त्यात नुकत्याच आलेल्या वाईल्ड कार्ड (Wild Card) सदस्यांनी सुरुवातीपासूनच घरात असलेल्या सदस्यांच्या नाकीनऊ आणले आहेत. अलिकडच्या भागात संकेत पाठकच्या (Sanket Pathak) खेळाबद्दल घरातील सदस्यांमध्ये चर्चा रंगताना पाहायला मिळाली. 

Continues below advertisement

एका सीनमध्ये संकेत आणि अनुश्री घरातील बदलत्या समीकरणांवर चर्चा करताना दिसले. या संभाषणात अनुश्रीनं घरातल्या 'काटा गँग'च्या स्ट्रॅटर्जीबद्दल आपली मतं मांडली. 'काटा गँग'ची रणनीती नेमकी काय असू शकते आणि त्यांचा खेळ कसा उलगडता येईल, यावर अनुश्रीनं संकेतला सांगितलं. पण, यावेळी मात्र संकेत शांतपणे ऐकत होता. संकेतनं कोणतंही वक्तव्य केलं नाही. 

यानंतर संकेत रेव्हा आणि संस्कृतीसोबत बोलताना दिसला. या वेळी संकेतनं आपल्या गेम स्ट्रॅटर्जीबद्दलची भूमिका स्पष्ट केली. तो 'बिग बॉस'चा खेळ वैयक्तिक पद्धतीनं खेळणार असल्याचं त्यानं सांगितलं. मात्र, बिग बॉसच्या घरात परिस्थितीनुसार, युती करणंही आवश्यक ठरू शकतं, हेही त्याने मान्य केलं. गरज भासल्यास तो विशालच्या गटासोबत किंवा राकेशच्या गटासोबत युती करण्याची शक्यता असल्याचं संकेतने स्पष्ट केलं.

दरम्यान, संकेतच्या या रणनीतीची चर्चा घरातील इतर सदस्यांमध्येही सुरू असल्याचं दिसलं. एका संभाषणात तन्वी राकेशसोबत बोलताना दिसली. संकेतच्या खेळाबद्दल आपलं निरीक्षण मांडताना तन्वीनं सांगितलं की, घरातील काही सदस्यांना संकेतचा गेम आता हळूहळू समजू लागला आहे.

तन्वीनं पुढे असंही सूचित केलं की, संकेत कदाचित विशालच्या गटाकडे झुकताना दिसतोय आणि पुढे त्या ग्रुपमध्ये स्वतःची मजबूत भूमिका निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतो. जर असं झालं, तर पुढील टप्प्यात संकेत राकेशसाठी थेट आणि मजबूत प्रतिस्पर्धी ठरू शकतो, असा इशाराही तन्वीनं दिला आहे.

घरातील विविध सदस्य संकेतच्या हालचाली आणि संभाव्य युतींबद्दल चर्चा करत असल्यानं त्याचा खेळ आता घरात चर्चेचा विषय ठरत आहे. पुढील भागांमध्ये संकेत आपली स्वतंत्र भूमिका कायम ठेवतो की एखाद्या गटासोबत ठामपणे उभा राहतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

घरात प्रेमाची कबुली दिली, बाहेर पडताच रुचिता विशालविषयी म्हणाली, चाहतेही म्हणाले, 'खोटारडी..'