Sanjay Leela Bhansali in Bollywood : निर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांना  बॉलिवूडमधील करिअरला आज पंचवीस वर्ष पूर्ण झाली. ब्लॅक, सावरीया, रामलीला, बाजीराव मस्तानी, हम दिल दे चुके सनम आणि देवदास  यासांरख्या भन्साळीच्या अनेक चित्रपटांनी चाहत्यांच्या मनावर छाप सोडली आहे. सध्या ते आपला दहावा चित्रपट गंगूबाई काठियावाडीवर काम सुरू आहे. अभिनेत्री आलीया भट्ट या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.


चित्रपटसृष्टीतील आपल्या कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने भन्साळी प्रोडक्शनने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट इन्स्टाग्रामवर वेगाने व्हायरल झाली आहे. यामध्ये आतापर्यंत भन्साळी यांनी ज्या कलाकारांसोबत काम केले त्यांचे संवाद , फेमस डायलॉग अशा आठवणींना उजाळा दिला आहे. भन्साळी म्हणाले, गेल्या 25 वर्षांपासून प्रेक्षकांनी माझ्यावर केलेल्या प्रेमाचे मी खरंच आभार मानतो. 


2015 साली संजय लीला भन्साळी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानत करण्यात आले. आतापर्यंत त्यांना 38 पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. यामध्ये  राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार, मिर्ची संगीत पुरस्कार, स्क्रीन पुरस्कार, आयफा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 






 नेपोटिझमवर भूमिका


बॉलिवूड स्टार्स, दिग्दर्शक, निर्माते यांच्यावर देशभरातून टीका करण्यात येत होती. यावर बोलताना प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी बॉलिवूडमध्ये नेपोटिझम नसल्याचा दावा केला आहे. यासंदर्भात बोलताना संजय लीला भन्साळी म्हणाले की, 'जर बॉलीवूडमध्ये नेपोटिझम असत तर माधुरी दीक्षित, कंगना रनौत, अक्षय कुमार यांसारखे कलाकार मोठे स्टार बनले नसते. एवढचं नव्हेतर ते एक यशस्वी निर्माता दिग्दर्शक झाले नसते. इंडस्ट्रीमध्ये मेहनत करणाऱ्या व्यक्तिला काम मिळतं आणि सुशांतने देखील आपल्या मेहेनतीन इंडस्ट्रीमध्ये काम मिळवलं होत.


संजय लीला भन्साळी आणि वाद यांचे फार जुने नाते आहे. बाजीराव मस्तानी, पद्मावत हे चित्रपट चित्रीकरणापासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यात आता त्यांच्या आणखी एका आगामी चित्रपटाची भर पडली आहे.


संबंधित बातम्या :