Sanjay Dutt vs Ranveer Singh : बॉलीवूडचा 'खलनायक' म्हणून ओळखला जाणारा संजय दत्त लवकरच अभिनेता रणवीर सिंगसोबत धुरंधर या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात दोघांचीही भूमिका दमदार आहे आणि त्यामुळे ते सध्या चर्चेत आहेत. पण इथे आपण त्यांच्या चित्रपटाबद्दल नाही तर वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणार आहोत. संजय आणि रणवीर दोघेही हिंदी चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार मानले जातात. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे त्यांच्या नेटवर्थमध्ये प्रचंड फरक आहे. तर पाहू या, दोघांपैकी जास्त श्रीमंत कोण आहे.

Continues below advertisement

संजय दत्तचा पहिला चित्रपट कोणता?

संजय दत्त हे हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज सुनील दत्त आणि नरगिस दत्त यांचे सुपुत्र आहेत. त्यामुळे त्यांचे बालपणापासूनचे जीवन ऐशोआरामात गेले. मोठे झाल्यावर त्यांनीही आपल्या आईवडिलांप्रमाणे अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले आणि रॉकी या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटाने संजयच्या कारकिर्दीला उंची गाठून दिली आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.

या चित्रपटातून केला शानदार कमबॅक

संजयच्या आयुष्यात एक काळ असा आला की त्यांचं टॉप करिअर अचानक रसातळाला गेलं. याच काळात त्यांचे नाव मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात आले आणि त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. पण मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटातून त्यांनी जबरदस्त पुनरागमन केले आणि पुन्हा एकदा बॉलीवूडवर अशी छाप सोडली की आजही त्यांची क्रेझ कायम आहे.

Continues below advertisement

संजय दत्तची नेटवर्थ किती आहे?

Financial Express च्या एका अहवालानुसार संजय दत्त यांची नेटवर्थ 295 कोटी रुपये आहे.

ते एका चित्रपटासाठी 8 ते 15 कोटी रुपये मानधन घेतात.

चित्रपटांशिवाय ब्रँड एंडोर्समेंट आणि प्रॉडक्शनमधूनही मोठी कमाई करतात.

रणवीर सिंग किती श्रीमंत आहे?

बॉलीवूडचा चार्मिंग स्टार रणवीर सिंगला इंडस्ट्रीत येऊन अवघे 14 वर्षे झाली आहेत. त्याचा पहिला चित्रपट बँड बाजा बारात होता, ज्यातून तो थेट प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला. त्यानंतर त्याने एकापेक्षा एक हिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. आता तो धुरंधर मध्ये दिसणार असून हा चित्रपट यावर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Siasat.com च्या अहवालानुसार रणवीर सिंग एका चित्रपटासाठी तब्बल 30 ते 40 कोटी रुपये फी घेतो.

त्याने आतापर्यंत अंदाजे 362 कोटी रुपयांची संपत्ती जमा केली आहे.

त्याच्या गाड्यांच्या कलेक्शनमध्ये टोयोटा लँड क्रूझर, मर्सिडीज मेबॅक GLS 600, जग्वार XLJ, मर्सिडीज बेंझ E क्लास, लँबोर्गिनी आणि अॅस्टन मार्टिन रॅपिड S अशा आलिशान गाड्या आहेत.

रणवीरकडे फक्त मुंबईतच नाही तर गोवा आणि अलीबागमध्येही कोट्यवधींची घरे आहेत.

या सर्व गोष्टींवरून पाहता रणवीर सिंगने अवघ्या 14 वर्षांत संजय दत्तसारख्या 44 वर्षांपासून सक्रिय असलेल्या अभिनेत्यालाही आलिशान जीवनशैलीत मागे टाकले आहे.

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Dashavatar Movie Box Office Collection: कोकणातला 'कांतारा' हिट की फ्लॉप? दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ची पहिल्या दिवसाची कमाई किती?