Sanjay Dutt Aakhri Sawal Movie Ban in UAE: संजय दत्तचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'आखरी सवाल' (Aakhri Sawal) बऱ्याच वादानंतर आणि बऱ्याच विलंबाने अखेर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालाय. खरंतर प्रदर्शनापूर्वी या चित्रपटाची फारशी चर्चा नव्हती. याचाच परिणाम या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरच्या कामगिरीमध्ये स्पष्टपणे दिसून आलाय. राजकीय आणि वैचारिक विषयावर आधारित असलेल्या या चित्रपटाला 'ओपनिंग डे ' लाच फटका बसल्याचं दिसत आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या चित्रपटाला UAE मध्ये बॅन करण्यात आलंय. तिथल्या सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) च्या 100 वर्षांच्या प्रवासावर आधारित असणाऱ्या या चित्रपटात अनेक संवेदनशील राजकीय मुद्द्यांवर भाष्य करण्यात आलं आहे.
आखरी सवाल चित्रपटावर UAE मध्ये बंदी
संजय दत्तचा ' आखरी सवाल ' हा चित्रपट मुळात 8 मे रोजी प्रदर्शित होणार होता. पण भारताच्या सेन्सॉर बोर्डाने त्याला मंजुरी दिली नाही. अखेर विलंबाने का होईना, संजय दत्तचा चित्रपट 15 मे रोजी भारतीय चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला.प्रदर्शनाच्या काही दिवस आधीच या चित्रपटाला सेन्सर बोर्डाने UA 16+ प्रमाणपत्र देऊन मंजुरी दिली.पण UAE सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील अनेक संवेदनशील दृश्ये कापण्यास सांगितली. मात्र, निर्मात्यांनी हे बदल स्वीकारण्यास नकार दिला. परिणामी अबु धाबी, दुबई, अजमान, फुजैरा, रास अल खैमा आणि उम्म अल क्वैन यासह यूएईच्या अनेक भागांमध्ये 'आखरी सवाल ' चित्रपटावर बंदी घालण्यात आली. यापूर्वी धुरंधर आणि बॉर्डर 2 सारख्या चित्रपटांनाही UAE ने चित्रपट प्रदर्शित करण्याची परवानगी नाकारली होती.मात्र ओटीपी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यानंतर तिथल्या प्रेक्षकांनीही चित्रपट पाहिले.
संजय दत्त गेल्या काही वर्षांत प्रामुख्याने मल्टी-स्टारर चित्रपटांमध्ये दिसला आहे. यात त्याने सहाय्यक आणि खलनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे, 'आखिरी सवाल' या चित्रपटाद्वारे तो प्रेक्षकांना चित्रपटगृहांपर्यंत आणू शकेल की नाही, हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक होते.'आखिरी सवाल'च्या निर्मात्यांनी अद्याप चित्रपटाचे बजेट अधिकृतपणे जाहीर केले नसले तरी, मिळालेल्या माहितीनुसार हा चित्रपट 30 -40 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे.
