Sanjay Dutt on Marathi Language : सध्या राज्यभर गणेशोत्सवानिमीत्त उत्साहाचं वातावरण आहे. राजकीय नेते, अभिनेते, खेळाडू विविध ठिकाणी मानाच्या गणपतींचं दर्शन घेताना दिसत आहेत. अशातच आज प्रसिद्ध अभिनेते संजय दत्त (Sanjay Dutt) यांनी ठाण्याच्या महाराजाचे (Thane Maharaja) दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मराठी भाषेच्या संदर्भाने वक्तव्य केले. मराठी भाषेवर खूप प्रेम करतो. शिकण्याचा प्रयत्न करेल. मी सर्व लहान थोरांना सांगेल की माझं शिक्षण शिमलामध्ये झालं आहे. शिमलामध्ये जी भाषा  होती ती आली. महाराष्ट्रमध्ये मी कमी राहिलो. पण 100 टक्के भविष्यात मी शिक्षक ठेवून मराठी भाषा (Marathi Language) शिकणार असल्याचे संजय दत्त म्हणाले. 

Continues below advertisement

Sanjay Dutt : नेमकं काय म्हणाले अभिनेते संजय दत्त? 

मला माहित होते तुम्ही मला हे विचारणार. मी राष्ट्रीय भाषा बोलतो. मराठी भाषेवर खूप प्रेम करतो. शिकण्याचा प्रयत्न करेल असे संजय दत्त म्हणाले. मी सर्व लहान थोरांना सांगेल की, माझं शिक्षण शिमलामध्ये झालं आहे. शिमलामध्ये जी भाषा  होती ती आली. पण महाराष्ट्रामध्ये मी कमी राहिलो. पण 100 टक्के भविष्यात मी शिक्षक ठेवून मराठी भाषा शिकणार असल्याचे संजय दत्त म्हणाले. 

ठाण्यावरती माझे खूप प्रेम, ठाणं माझं घर आहे

ठाण्यावरती माझे खूप प्रेम आहे. ठाणे माझं घर आहे. मी लहानपणी ठाण्यामध्ये येत होतो. माझ्या मित्राची ठाण्यात फॅक्टरी होती असेही संजय दत्त म्हणाले. आमदार रवींद्र फाटक माझे मित्र आहेत. माझावर यांचे खूप प्रेम आहे असे संजय दत्त म्हणाले, म्हणून मला असे वाटते आहे की मला ठाण्यात घर घ्यावे लागेल असेही दत्त म्हणाले. 1993 साली या ठाण्यामध्ये मी जेलमध्ये होतो. तेव्हापासून ठाण्यात खूप डेव्हलपमेंट झाली आहे असेही ते म्हणाले. 

Continues below advertisement

पूर्ण विश्व शांती रहो भाईचारा रहो, संजय दत्त यांची गणपतीकडे प्रार्थना

प्रसारमाध्यमांनी अभिनेते संजय दत्त यांनी गणपतीकडे नेमकी काय प्रार्थना केली याबाबत विचारणा करण्यात आली. पूर्ण विश्व शांती रहो भाईचारा रहो, इज्जत वाढव, आम्ही सर्व एकत्र राहू एवढेच सांगतो असेही संजय दत्त म्हणाले.  मी 1993 ला ठाण्यात जेल मध्ये होतो, तेव्हा पासून आता पर्यंत खूप बदल आणि विकास झाला आहे. मी राष्ट्रभाषा बोलतो, पण मी नक्कीच शिक्षक ठेऊन मराठी शिकणार असा उच्च त्यांनी केला.