Sanjay Dutt Fish Cocktail: संजय दत्त सध्या धुरंधर 2 (Dhurandhar 2) चित्रपटातील त्याच्या भूमिकेमुळे प्रचंड चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी 'सरके चुनर' (Sarke Chunar) गाण्यावरून ट्रॉल झालेला संजय आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. (Sanjay Dutt) यावेळी तो ट्रोल होतोय त्याच्या नव्याने सुरू झालेल्या रेस्टॉरंटमुळे. काही दिवसांपूर्वी संजय दत्तने त्याचा मित्र सोबत 'अल्ता स्टेला' नावाचं रेस्टॉरंट उघडलं होतं. या रेस्टॉरंटमधील सर्व्ह केल्या जाणाऱ्या कॉकटेलमुळे तो गेल्या काही दिवसांपासून प्रचंड ट्रोल होतोय. 

Continues below advertisement

जिवंत मासा असलेलं कॉकटेल या रेस्टॉरंटमध्ये दिलं जात होतं. काही दिवसांपूर्वी संजय दत्तने या कॉकटेलचे जाहिरातही पोस्ट केली होती. या जाहिरातीत कॉकटेलमध्ये एक जिवंत मासा आणि त्याच्यावर आग लावलेली दिसत होती. या जाहिरातीवर अनेक ऍनिमल वेल्फेअरच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. त्याचं हे कॉकटेल सोशल मीडियावरही प्रचंड ट्रोल झालं. आता वाद इतका वाढला की संजय दत्तला त्याच्या 'कॉकटेल मेन्यू'मधून हे 'फिश कॉकटेल' काढून टाकावे लागलं आहे.

जिवंत मासा कॉकटेलमध्ये, संजय दत्त ट्रॉल 

मार्च महिन्यात संजय दत्तने त्याचा मित्रासोबत उघडलेल्या 'अल्ता स्टेला' रेस्टॉरंट बारमध्ये सर्व्ह केल्या जाणाऱ्या एका कॉकटेलमुळे मोठी खळबळ उडाली आहे. 'एबीसु कॉकटेल' नावाच्या या ड्रिंकमध्ये जिवंत मासा असतो आणि वरच्या बाजूला आग लावली जाते. रेस्टॉरंटने शेअर केलेल्या एका कॉकटेलच्या व्हिडिओमध्ये हे ड्रिंक दिसलं होतं. एका इन्क्लूएंट सर्च व्हिडिओत जिवंत मासा असलेले हे कॉकटेल दिसल्याने हा व्हिडिओ नंतर प्रचंड व्हायरल झाला. हे कॉकटेल पाहून अनेकांनी कमेंट्समध्ये संताप व्यक्त केला. शिवाय या रेस्टॉरंटमध्ये डेकोरेशन साठीही टेबलावर जिवंत मासे ठेवण्यात आले होते. त्याचा संबंध या कॉकटेलशी जोडण्यात आला आणि या ड्रिंकवर अनेकांनी आक्षेप घेतला. शेवटी रेस्टॉरंटचा सोशल मीडिया वरून एक पोस्ट करण्यात आली आणि 'एबीस कॉकटेल' रेस्टॉरंटच्या मेन्यू कार्ड मधून हटवल्याचे सांगण्यात आलं.

Continues below advertisement

हे कॉकटेल नेमकं काय ?

या पोस्टमध्ये या कॉकटेलची मूळ प्रेरणा ही मीन राशिपासून घेतली होती असं सांगण्यात आलं. द्वैत, प्रवाहीपणा आणि सह अस्तित्वाचं हे प्रतीक असल्याचा दावा या पोस्टमधून करण्यात आला. या कॉकटेल साठी वापरला जाणारा मासा हा बेट्टा फिश म्हणून ओळखला जातो. हे मासे स्वभावाने एकटे राहणारे असतात आणि पाण्याच्या पृष्ठभागावरूनही श्वास घेऊ शकतात. त्यामुळे अनेकदा या माशांना स्वतंत्रपणे ठेवले जाते. जगभरातील अनेक रेस्टॉरंटमध्ये खरंतर हे कॉकटेल सर्व्ह केलं जाते. टोकियो, लंडन, न्यूयॉर्क इथे अनेक बार  हा वेगळा अनुभव घेण्यासाठी हे कॉकटेल विकतात. तो मासा ड्रिंकमध्ये मिसळलेला नसतो.तो वेगळ्या काचेत/चेंबरमध्ये फक्त दिसण्यासाठी (visual presentation) ठेवलेला असतो. म्हणजे तुम्ही फक्त कॉकटेल पिता, मासा नाही.