Samrat Prithviraj box office collection Day 3 : बॉलिवूडचा खिलाडी असणाऱ्या अक्षय कुमारचा (Akshay Kumar) आणि मानुषी छिल्लरचा (Manushi Chhillar) सम्राट पृथ्वीराज (Samrat Prithviraj) हा चित्रपट शुक्रवारी (3 जून) रिलीज झाला. पहिल्या वीकेंडला बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. चित्रपटाने शुक्रवारी (3 जून) 10.70 कोटी रुपयांची कमाई केली होती, तर शनिवारी (4 जून) 12.50 कोटी रुपयांची कमाई केली. सम्राट पृथ्वीराजने आता रविवार (5 जून) रोजी 16 कोटी रुपयांची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर कमल हासनच्या विक्रम आणि मेजरशी टक्कर झाल्यामुळे सम्राट पृथ्वीराज चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर सुरुवात संथ झाली होती.
रविवार या चित्रपटानं 16 कोटींची कमाई केल्याची शक्यता आहे. असा अंदाज रमेश बाला यांनी लावला आहे. जवळपास 39 कोटींची कमाई या चित्रपटानं आत्तापर्यंत केली आहे.
अभिनेता अक्षय कुमारनं पृथ्वीराज चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. रिपोर्टनुसार या चित्रपसाठी त्यानं 60 कोटींचे मानधन घेतलं आहे. पृथ्वीराज या चित्रपटामधून मानुषीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. ती या चित्रपटामध्ये संयोगिता ही भूमिका साकारली आहे. या चित्रपटासाठी मानुषीनं एक कोटी एवढे मानधन घेतलं आहे, अशी चर्चा आहे. केजीएफ चॅप्टर-2 या चित्रपटामुळे सध्या संजय दत्त चर्चेत आहे. आता त्या चित्रपटानंतर लवकरच पृथ्वीराज या चित्रपटामधून संजय प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. रिपोर्टनुसार, पृथ्वीराज चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारण्यासाठी संजयनं पाच कोटी मानधन घेतलं आहे. हिंदी, तमिळ आणि तेलगू या भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज झाला आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी सम्राट पृथ्वीराज या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
हेही वाचा: