Sameer Wankhede Wife Kranti Redkar Reply To Trollers: बॉलिवूडचा किंग शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या चर्चेत आहे, तो त्यानं दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मुळे (The Ba***ds of Bollywood). आर्यन खाननं (Aaryan Khan) दिग्दर्शित केलेल्या या सीरिजमध्ये चाहत्यांनी अनेक हाय-प्रोफाइल कॅमिओ पाहिले आहेत, जे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. दरम्यान, या सर्वात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलेली गोष्ट म्हणजे, सीरिजच्या पहिल्या भागात आर्यन खानच्या वैयक्तिक आयुष्यातील एका घटनेचा करण्यात आलेला उल्लेख. खरं तर, 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या पहिल्या भागात आधारित, आर्यन खाननं 2021 मध्ये ड्रग्ज प्रकरणात अटक केलेल्या माजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर टीका केली आहे. 

Continues below advertisement

 सोशल मीडियावर आर्यन खानच्या सीरिजमधला एक सीन जोरदार व्हायरल होत आहे. त्यामध्ये शोमधला मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता लक्ष्य एका पार्टीला जातो. समीर वानखेडेसारखा दिसणारं एक पात् या सीरिजमध्ये आहे, पोलीस व्हॅन घेऊन या पात्राची एन्ट्री होते आणि पार्टीत छापा टाकतो. याशिवाय, तो 'सत्यमेव जयते'चा जयघोष करताना दिसतो. दरम्यान, ड्रग्ज प्रकरणात ज्यावेळी आर्यन खानला अटक करण्यात आलेली, त्यावेळी हे प्रकरण जोरदार गाजलं होतं. त्यावेळी या प्रकरणात समीर वानखेडे अनेकदा 'सत्यमेव जयते'चा जयघोष करताना दिसलेले. या पात्राची तुलना युजर्सकडून समीर वानखेडेंसोबत केली जात आहे. अशातच आता जोरदार ट्रोलिंगनंतर समीर वानखेडे यांची पत्नी मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर (Marathi Actress Kranti Redkar) हिनं एक पोस्ट केली आहे. 

क्रांती रेडकरनं पोस्टमध्ये काय म्हटलंय? 

समीर वानखेडे यांची पत्नी मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये तिनं समीर वानखेडे एका कार्यक्रमात बोलत असतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. समीर वानखेडेंनी ज्या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावलेली, तो कार्यक्रम ड्रग्सविरोधी एका मोहिमेसंदर्भात होता. या कार्यक्रमादरम्यान, समीर उपस्थितांना ड्रग्स किती वाईट आणि हानिकारक आहेत, याबाबत संबोधन केलं. हाच व्हिडीओ क्रांती रेडकरनं शेअर केला आहे. तसेच, एक कॅप्शनही लिहिलं आहे.  

मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरनं कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "अंमली पदार्थांचं व्यसन ही एक गंभीर समस्या आहे आणि त्याची खिल्ली उडवणं किंवा त्याकडे दुर्लक्ष करणं हे खूप धोकादायक आहे... समाजातील प्रत्येक व्यक्तीनं या समस्येचं गांभीर्य समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात होणारे मोठे दुष्परिणाम टाळता येतील..."

पुढे बोलताना क्रांतीनं लिहिलंय की, "चांगलं काम करत राहा @swankhede.irs, समाजासाठी तुमचं योगदान खूप मोठं आहे आणि आम्हाला सर्वांना तुमचा खूप अभिमान आहे. तुम्ही आठवड्याचे शेवटचे दिवस मजा करण्यात, सुट्टीमध्ये घालवू शकता, पण तुम्ही ड्रग्जविरोधी जागरूकता व्याख्यानं आणि कार्यक्रम आयोजित करणं निवडता. आम्ही सर्व तुमच्या आणि तुमच्या चळवळीच्या पाठीशी उभे आहोत..." असं म्हणत क्रांतीनं आपले पती समीर वानखेडेंच्या कामाचं कौतुक केलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Dilip Prabhavalkar On Sachin Pilgaonkar: 'हो... सचिन पिळगावकर मला सिनिअर...'; दिलीप प्रभावळकरांचं प्रामाणिक उत्तर, महागुरूंबाबत म्हणाले...