Dilip Prabhavalkar On Sachin Pilgaonkar: सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office) एका मराठमोळ्या सिनेमाची (Marathi Movie) जोरदार चर्चा रंगली आहे. तो सिनेमा म्हणजे, 'दशावतार'. कोकणात शुटिंग झालेला आणि कोकणातल्या मुळाशी घेऊन जाणारा हा सिनेमा रसिक-प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. 2025 मध्ये रिलीज झालेल्या मराठी सिनेमांपैकी 'दशावतार'नं सर्वात मोठी ओपनिंग करुन मराठी सिनेसृष्टीला वेगळ्या उंचीवर नेलंय. या सिनेमात हाफ मॅड बाबुली म्हणजेच, 81 वर्षांचे दिलीप प्रभावळकर आपल्या अभिनयानं सर्वांना वेड लावतात. त्यांचा अभिनय थेट मराठी प्रेक्षकांच्या काळजाला हात घालतो. तसेच, या सिनेमात दिलीप प्रभावळकरांच्या कामाचं कौतुक करण्याचं कारण म्हणजे, या सिनेमातील सर्वच्या सर्व स्टंट त्यांनी स्वतः केले आहेत. अशातच, मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज नट असलेले दिलीप प्रभावळकर महागुरू सचिन पिळगावकर यांना सिनिअर आहेत की,...? याची चर्चा रंगली आहे. 

Continues below advertisement

सिनेसृष्टीत 81 वर्षांचे दिलीप प्रभावळकर सिनिअर की, महागुरू सचिन पिळगावकर? असा प्रश्न एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' कार्यक्रमात दिलीप प्रभावळकरांनाच विचारण्यात आलेला. त्यावर बोलताना त्यांनी अगदी तात्काळ हो असं उत्तर दिलं. ते म्हणाले की, "हो... सचिन पिळगावकर मला सीनियर आहे..." तसेच, ज्यावेळी त्यानं इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली, त्यावेळी मी काम करत नव्हतो, असंही त्यांनी सांगितलं. 

Continues below advertisement

सचिन पिळगावकरांना तुम्ही सिनिअर आहात का? दिलीप प्रभावळकर म्हणाले... 

एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' कार्यक्रमात 'दशावतार' सिनेमाची संपूर्ण टीम उपस्थित होती. त्यावेळी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकरांना काही प्रश्न विचारण्यात आले. तुम्ही अभिनय करताय त्याला आता साठ वर्ष होऊन गेलीत का? की साठपेक्षा जास्त...? त्यावर दिलीप प्रभावळकरांनी उत्तर दिलं की, हो मला पन्नास एक वर्ष झाली. त्याहून जास्त... त्यावर दिलीप प्रभावळकरांना विचारण्यात आलं की, सचिन पिळगावकरांना तुम्ही सिनिअर आहात का? त्यावर दिलीप प्रभावळकरांनी उत्तर देताना म्हटलं की, "नाही त्यानं 'हा माझा मार्ग एकला' केला तेव्हा मी इंडस्ट्रीत काम करत नव्हतो... हो अभिनयाच्या बाबतीत असणारच ना... 'हा माझा मार्ग एकला' सचिननं चार-पाच वर्षांचा असताना केला... त्यामुळे मला नाही वाटत की, मी तेव्हा काम करत होतो... तो मला सिनिअर आहे..."

दरम्यान, बॉक्स ऑफिसवर गाजत असलेल्या 'दशावतार' सिनेमात मुख्य भूमिकेत दिलीप प्रभावळकर झळकले आहेत. वयाची ऐंशी ओलांडलेल्या दिलीप प्रभावळकरांनी सिनेमात दशावतार सादर करणारे कलाकार बाबुली मेस्त्री यांची भूमिका साकारली आहे. दिलीप प्रभावळकर यांच्याव्यतिरिक्त महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, आरती वडगबाळकर यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Dashavtar Movie Director Subodh Khanolkar On Dilip Prabhavalkar: 'दशावतार' सिनेमासाठी दिलीप प्रभावळकर नाहीतर, रजनीकांत होते पहिली पसंत? दिग्दर्शक म्हणाले...