Prathamesh Parab Kshitija Ghosalkar Engagement : 'टाईमपास' (Timepass) फेम अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) याने नुकताच साखरपुडा केला आहे. 'व्हॅलेंटाईन्स डे'च्या (Valentines Day) दिवशी प्रथमेश आणि त्याची गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकर () यांचा साखरपुडा संपन्न झाला. मागील अनेक दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीमध्ये लग्नाचे वारे वाहत आहेत. गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडूलकर, स्वानंदी टीकेकर आणि आशिष कुलकर्णी, शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे हे नुकतच लग्नबंधनात अडकले. तसेच अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके यांनी देखील त्यांच्या प्रेमाची कबुली दिली. तसेच आता लवकरच प्रथमेश देखील लग्नबंधनात अडकणार आहे. 






अनेक दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर प्रथमेश आणि क्षितिजाने संसार थाटण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रथमेशने त्याच्या चाहत्यांना हा सुखद धक्का दिला. तसेच व्हॅलेंटाईन्स डे हा प्रथमेशसाठी खास असून याबद्दल प्रथमेशनेच भाष्य केलं होतं. त्यामुळे त्यांनी व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशीच साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला होता. 






प्रथमेशच्या लग्नाचा मुहूर्त


प्रथमेश परब आणि क्षितिजाने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत साखरपुडा आणि लग्नाची तारीख जाहीर केली होती. 14 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांचा साखरपुडा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर लगेचच 10 दिवसांनी 24 फेब्रुवारीला ते लग्नबंधनात अडकणार आहेत. 


प्रथमेशसाठी म्हणून आहे व्हॅलेंटाईन्स डे खास


अभिनेता प्रथमेश परबसाठी व्हॅलेंटाईन डे खूपच खास आहे. यासंदर्भात त्याने खास पोस्टदेखील शेअर केली होती. त्याने लिहिलं होतं,'व्हॅलेंटाईन डेचं आमच्या रिलेशनमध्ये विशेष स्थान आहे. म्हणजे आमचा या कंसेप्टवर विश्वास नाही. पण कधीकधी खास न वाटणाऱ्या गोष्टी खूप खास बनतात. 14 फेब्रुवारी 2020 रोजी मी क्षितिजाची व्हॅलेंटाईन डे स्पेशल सीरिज पाहिली आणि तिला मेसेज केला होता. 14 फेब्रुवारी 2021 रोजी आम्ही रिलेशनमध्ये आलो. 14 फेब्रुवारी 2022 रोजी आमच्या रिलेशनला एक वर्ष पूर्ण झालं. 14 फेब्रुवारी 2023 रोजी आम्ही आमचं रिलेशन जगजाहीर केलं. त्यामुळे आम्ही 14 फ्रेब्रुवारी रोजी साखरपुडा करणार आहोत.'






ही बातमी वाचा : 


Zee Marathi Serial : 'पुन्हा कर्तव्य आहे' , 'झी मराठी'वर सुरु होणार नवी गोष्ट, 'ही' नवी जोडी झळकणार मुख्य भूमिकेत