Sambhavana Seth On Abortion: 'बिग बॉस 2' (Bigg Boss 2) या रिअॅलिटी शोमधून प्रसिद्धी मिळवलेली संभावना सेठनं (Sambhavana Seth) अनेक टेलिव्हिजन मालिकांमधून लोकांचं मनोरंजन केलं. सध्या छोट्या पडद्यापासून लांब असलेली संभावना सेठ तिच्या पर्सनल लाईफमुळे (Personal Life) मात्र चर्चेत आली आहे. संभावनाला तिच्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंगातून जावं लागलं. सध्या ती आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी व्हीव्लॉगिंग करते. आपल्या व्लॉग्समधून ती चाहत्यांना प्रत्येक लहान-मोठ्या अपडेट्स देत असते. 14 जुलै 2016 रोजी संभावनानं अभिनेता-लेखक अविनाश दिवेदी (Avinash Dwivedi ) लग्न केलं. दोघांचा सुखी संसार चांगला सुरू होता. पण, कुणाचीतरी नजर लागली, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. संभावनानं तिच्या आयुष्यात आलेल्या वादळाबाबत स्वतः खुलासा केला आहे.
संभावना सेठ आणि तिचा पती अविनाश मिश्रा दोघेही बऱ्याच काळापासून फॅमिली प्लानिंग करत आहेत. 2024 मध्ये संभावनाला दिवस गेले, पण दुर्दैवानं फक्त तीनच महिन्यांत तिचा गर्भपात (Miscarriage) झाला. संभावनासाठी हा फार मोठा धक्का होता. धक्क्यातून सावरल्यानंतर आता संभावनानं तिच्या गर्भपातातबाबत भाष्य केलं आहे. त्यासाठी तिनं तिच्या डॉक्टरांना पूर्णपणे जबाबदार धरलं आहे. संभावनानं तिचं गरोदरपणा, त्यानंतरचा गर्भपात याबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत बोलताना संभावना म्हणाली की, ती गरोदर राहिली, त्यानंतर तिनं बेबी बंपसह फोटो सेशनही केलं. गरोदरपणाच्या तिसऱ्या महिन्यात स्कॅन केल्यानंतर, ती तिच्या पतीसोबत केलेल्या बेबी बंप फोटोशूटसह प्रेग्नंसी अनाउंस करणार होती. तिनं सांगितलं की, ज्यावेळी तिला तिच्या गर्भपाताबाबत कळालं, त्यावेळी तो तिच्यासाठी खूप मोठा धक्का होता. संभावना म्हणाली की, तिच्या गर्भपातासाठी पूर्णपणे डॉक्टर जबाबदार आहेत. डॉक्टरांच्या चुकीमुळेच तिनं तिच्या आयुष्यातला आनंद गमावला. ज्यावेळी संभावनाला खूप वेदना होत होत्या. त्यावेळी तिनं डॉक्टरांना याबाबत सांगितलं. पण, डॉक्टरांनी तिची तपासणी केली नाही. संभावना म्हणाली की, तिच्या डॉक्टरांनी एंब्रोयो ट्रांसप्लांटपूर्वी जेनेटिक्स टेस्ट केली नव्हती.
त्याबद्दल बोलताना संभावना म्हणाली ती, "जेव्हा तुम्ही गर्भ प्रत्यारोपण करता तेव्हा त्यापूर्वी अनुवांशिक चाचणी केली जाते आणि त्यांनी नेमकी ती चाचणीच केली नाही. मुळात ते जेनेटिकली अबनॉर्मल होते. जर हे पाचव्या महिन्यात झालं असतं तर काय झालं असतं? याची कल्पना करा."
मी १५ दिवसांपूर्वी माझे मूल गमावलेलं, पण मला माहीतच नव्हतं...
संभावनानं सांगितलं की, तिसऱ्या महिन्याच्या स्कॅन दरम्यान तिला गर्भपात झाल्याची माहिती मिळाली. पण सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, स्कॅनच्या 15 दिवस आधीच संभावनानं तिचं बाळ गमावलं होतं आणि तिला त्याबद्दल काहीच माहिती नव्हती. संभावना म्हणाली की, तिला खूप वेदना होत होत्या, पण तिच्या डॉक्टरांनी तिला सांगितलं की, ते तिच्या संधिवातामुळे होत आहे.
15 दिवस गेलेलं बाळ पोटात घेऊन फिरत होते...
संभावना म्हणाली की, "तुम्ही कल्पना करू शकता की, मी तिसऱ्या महिन्यात स्कॅनसाठी गेले होते, तेव्हा मला कळलं की, सर्व काही 15 दिवसांपूर्वीच संपलंय. म्हणजे, 15 दिवस मी माझं गेलेलं बाळ पोटात घेऊन फिरत होते. मला काहीही होऊ शकलं असतं. आणि मी 15 दिवसांपासून म्हणत होते की, मला खूप दुखतंय.
19 डिसेंबर 2024 रोजी, अविनाश आणि संभावना यांनी त्यांचं मूल गमावलं. यासंदर्भात त्यांनी एक व्लॉग शेअर केला. या जोडप्याच्या लग्नाला आठ वर्ष झाली आहेत आणि ते गर्भधारणा होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. अविनाश आणि संभावना यांनी सांगितलं की, ते आयव्हीएफ करण्याचा प्रयत्न करत होते, पण ते यशस्वी झाले नाही. अविनाश व्हीलॉगची सुरुवात संभावनानं जन्मापूर्वीच बाळ गमावल्याचं सांगून करतो.
पाहा व्हिडीओ :
महत्त्वाच्या इतर बातम्या :
पैसे अंडरवर्ल्डमधून यायचे, दाऊद इब्राहिम बॉलिवूडला पोसायचा...; दिग्गज अभिनेत्रीनं पितळं उघडं पाडलं