Ranveer Allahbadia Viral Video: कॉमेडीयन समय रैना (samay raina) सध्या चांगलाच चर्चेत आहे. 'इंडियाज गॉट लेटेंट'शो (indias got latent) मध्ये युट्यूबर रणवीर अलाहाबादियाने (ranveer allahabadia) अश्लील कमेंट केल्याने समय रैना आणि रणवीरवर मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे. यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या वादानंतर समय रैनाने 'इंडियाज गॉट लेटेंट'चे सर्व एपिसोड डिलीट केले आहेत. काल (बुधवारी, ता-12) रात्री इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करून समय रैनाने ही माहिती दिली. यापूर्वी रणवीर अलाहाबादियाचा रडतानाचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये रणवीर ढसाढसा रडताना दिसत आहे. माझ्यामुळे सर्व काही संपले, असेही तो म्हणतो. आता या व्हिडीओ कधीचा आहे, जाणून घ्या सविस्तर

समय रैनाने व्हिडिओ हटवले

'इंडियाज गॉट लेटेंट'चे निर्माते आणि होस्ट रणवीर अलाहाबादियासोबतच, समय रैना सोशल मीडियावर खूप ट्रोल होत आहे. या शोमध्ये सहभागी झालेल्या 30-40 कंटेंट क्रिएटर्सविरोधात महाराष्ट्रातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा वाद निर्माण झाल्यानंतर आता समयने यूट्यूबवरून शोचे सर्व भाग हटवले आहेत.

रणवीरचा रडतानाचा व्हिडिओ व्हायरल 

रणवीरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो ढसाढसा रडताना दिसत आहे. माझ्यामुळे सर्व काही संपले, असेही तो म्हणतो. माझ्यामुळे काम थांबले, मला अपराधी वाटत आहे, असेही तो म्हणतो. आता या व्हायरल व्हिडिओनंतर लोकांना वाटतंय की, 'इंडियाज गॉट लेटेंट'मध्ये झालेल्या वादानंतर या व्हिडिओमध्ये रणवीर रडत आहे.

काय आहे व्हायरल व्हिडिओचे सत्य?

मात्र, या व्हिडिओचे सत्य वेगळंच आहे. वास्तविक हा व्हायरल व्हिडिओ आत्ताचा नाही. हा व्हिडिओ तीन वर्षे जुना आहे. कोविडच्या काळात रणवीरने त्याच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यावेळी रणवीरला कोविड झाला होता, त्यामुळे त्याचे कामही थांबले होते. त्यावेळी रणवीरने रडतानाचा हा व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओचा 'इंडियाज गॉट लेटेंट' प्रकरणाशी काहीही संबंध नाही.

समय रैनाने इन्स्टावर पोस्ट केली शेअर 

शोमधील वादानंतर समय रैनाने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली आहे. ज्यात त्याने लिहिले की, 'जे काही घडत आहे, ते हाताळणे माझ्यासाठी खूप कठीण आहे. मी माझ्या चॅनलवरून 'इंडियाज गॉट लेटेंट'चे सर्व व्हिडिओ काढून टाकले आहेत. लोकांना हसवणे आणि त्यांना चांगला वेळ देणे हाच माझा उद्देश होता. मी सर्व एजन्सींना तपासात निःपक्षपातीपणे, पूर्ण सहकार्य करेन. धन्यवाद.'