Samantha Ruth Prabhu  :  दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा (Samantha) ही तिच्या अभिनयामुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. पुष्पा द राइज या चित्रपटातील तिच्या आयटम साँगला प्रेक्षकांची पसंती मिळाली. सध्या ती वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. समंथा घर सोडून चक्क चित्रपटाच्या शूटिंग सेटमध्ये राहात आहे. यामागे कारण देखील स्पेशल आहे. 


हे आहे कारण
रिपोर्टनुसार, समंथानं यशोदा (Yashoda) या तिच्या आगामी चित्रपटच्या सेटवर राहण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाचा सेट हा एका आलिशान हॉटेलसारखा आहे. हा सेट एवढा भव्य आणि आलिशान आहे  असल्यानं समंथानं शूटिंग झाल्यानंतर देखील तिथेच राहण्याचा निर्णय घेतला.आर्ट डायरेक्टर अशोक कोरालथ यांनी या चित्रपटाचा सेट डिझाइन केला आहे. हा सेट 200 लोकांनी तयार केला आहे. 





समंथाने नुकताच तिच्या 'शकुंतलम' या आगामी चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.  या पोस्टरला समंथाच्या चाहत्यांची पसंती मिळाली आहे. या चित्रपटात अभिनेत्री एका सुंदर राणीच्या भूमिकेत दिसणार आहे. समांथाचे चाहते तिच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 


महत्वाच्या बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha