Samantha Ruth Prabhu : अभिनेत्री समंथा (Samantha) आणि नागा चैतन्य  (Naga Chaitanya) यांनी  गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांच्या चाहत्यांना घटस्फोटाबद्दल माहिती दिली. सध्या नागा चैतन्य आणि ‘मेड इन हेवन’ फेम अभिनेत्री शोभिता धुलिपाला (Shobita Dhulipala) यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत, असंही म्हटलं जात आहे.  नागा चैतन्य आणि  शोभिता यांच्या नात्याबाबत समंथाची पीआर टीम अफवा पसरवत आहे, असा आरोप समंथावर नागा चैतन्यच्या काही चाहत्यांनी केला. या आरोपावर समंथानं सडेतोड उत्तर दिलं आहे. 


काही दिवसांपूर्वी  शोभिताला  नागा चैतन्यच्या घरी स्पॉट करण्यात आलं. त्यानंतर दोघांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली.  नागा चैतन्य आणि  शोभिता यांच्या नात्याबाबत समंथाची पीआर टीम अफवा पसरवत आहे, असं नागा चैतन्यच्या काही चाहत्यांचे मत आहे. याबाबत ट्वीट करुन समंथानं सडेतोड उत्तर दिलं. ट्वीटमध्ये समंथानं लिहिलं, 'मुलींबाबत अफवा असेल तर लोक त्याला खरी गोष्ट समजतात पण जर मुलाच्या नात्याबाबत  कोणती चर्चा सुरु असेल तर मुलगी अफवा पसरवत आहे, असं म्हटलं जात. ज्या लोकांबाबत लोक चर्चा करत आहेत, ते मूव्ह ऑन झालेले आहेत, तुम्ही पण मूव्ह ऑन व्हा. स्वत:च्या कामाकडे आणि कुटुंबाकडे लक्ष द्या. '






समंथा आणि नागा चैतन्यची अशी होती लव्ह स्टोरी 
‘ये माया चेसावे’ या तेलगू चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान समंथा आणि नागा चैतन्यची भेट झाली.  त्यानंतर ‘ऑटोनगर सूर्या’ या चित्रपटाच्या सेटवर ते पुन्हा भेटले. 6 ऑक्टोबर  2017 रोजी समंथा आणि नाग चैतन्य लग्नबंधनात अडकले. समंथा ही 'शकुंतलम' या चित्रपटामधून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 


हेही वाचा: