Samantha Ruth Prabhu Video: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिला मागील काही दिवसांपासून तिच्या लूकमुळे सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. खरं तर, तिच्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे काही युजर्स नाराज आहेत. समंथा रुथ प्रभूच्या चाहत्यांना ती ‘खूपच बारीक’ किंवा ‘आजारी’ दिसत असल्याचं वाटत आहे. यावर आता सामंथाने स्वतःचा एक व्हिडिओ शेअर करत ट्रोल करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. या व्हिडिओमध्ये ती वर्कआउट करताना दिसते.
सामंथा रुथ प्रभुचं ट्रोलर्सना प्रत्युत्तर
सामंथाने काल आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये ती व्यायाम करताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करत तिने लिहिलं, "मुद्दा हा आहे – तुम्ही मला बारीक, आजारी किंवा काहीही म्हणू शकत नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतः मी करत आहे, तो व्यायाम करुन दाखवत नाहीत." समंथाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे आणि चाहते तिचं भरभरून कौतुक करत आहेत.
वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत
सामंथाने साउथ अभिनेता नागा चैतन्य याच्यासोबत प्रेमविवाह केला होता. मात्र चार वर्षांच्या संसारानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि त्यांनी घटस्फोट घेऊन वेगळं होण्याचा निर्णय घेतला. सध्या समंथा दिग्दर्शक राज निदिमोरू यांच्यासोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आहे. मात्र या गोष्टीवर अद्याप तिने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
सामंथा लवकरच या चित्रपटांमध्ये झळकणार
वर्क फ्रंटबाबत बोलायचं झालं, तर सामंथा शेवटची ‘सिटाडेल: हनी बनी’ या प्राइम व्हिडिओच्या वेब सिरीजमध्ये झळकली होती. आता ती लवकरच ‘मां इंति बंगाराम’ या चित्रपटात दिसणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाची निर्मिती सामंथा स्वतः करत आहे. याशिवाय तिच्याकडे ‘रक्त ब्रह्मांड: द ब्लडी किंगडम’ हा आणखी एक प्रोजेक्ट आहे. समंथाला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहते खूपच उत्सुक आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
जेव्हा ऐश्वर्या रॉयने करीना कपूरला दिला होता अवॉर्ड, 24 वर्षांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल