Samatha Ruth Prabhu: दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूच्या ( samatha Ruth Prabhu) चित्रपटांची जेवढी चर्चा होते तेवढंच तिचं वैयक्तिक आयुष्यातही काय घडतंय याचं कुतुहल चाहत्यांना असतं. समंथा आणि तेलगू सुपरस्टार नागा चैतन्य यांनी घटस्फोट घेतल्यानंतर तिला मोठ्या सामाजिक दबावाला सामोरं जावं लागलं. नुकत्याच एका मुलाखतीत घटस्फोटाच्या प्रक्रीयेतून जाताना तिच्यावर समाजाकडून कशा पद्धतीची टीका केली गेली यावर ती बोलली आहे. काही महिन्यांपूर्वी समंथानं तिच्या लग्नातला गाऊनला कात्री लावत त्यापासून नवा ड्रेस बनवल्याचं सांगितलं होतं. नागा चैतन्यसोबत ख्रीश्चन पदधतीच्या लग्नात तिनं हा गाऊन घातला होता. गाऊनला कात्री लावण्यामागे काय हेतू होता हेही तिनं सांगितलंय.
'सेकंड हँड', 'आयुष्य उद्धस्त करून बसलेली स्त्री...'
गलाटा इंडियाला दिलेल्या मुलाखतीत समंथानं नागा चैतन्यशी लग्नानंतर चार वर्षात घटस्फोट घेताना किती खालच्या पद्धतीनं टीका झाली हे सांगितलं. जेंव्हा एखादी स्त्री घटस्फोटाच्या प्रक्रीयेतून जात असते तेंव्हा तिच्यावर लज्जास्पद पद्धतीनं टीका केली जाते. तिच्यावर नसते कलंक लावले जातात असंही समंथा सांगते. ती म्हणाली, माझ्यावर लोकांनी अत्यंत वाईट कमेंट्स केल्या. सेकंड हँड, आयुष्य उद्धस्त करून बसलेली स्त्री अशा खालच्या पातळीवर टीका करण्यात आली. यामुळं तुमच्यात इतकी नकारात्मकता वाढते की स्वत:विषयी कोणतीच गोष्ट चांगली वाटत नाही. अपयशी झाल्याची भावना येते. एकेकाळी तुम्ही लग्न केलं होतं आणि आता तुम्ही विवाहित नाही याबद्दल तुम्हालाच अपराधी वाटू लागतं. हे या परिस्थितीतून गेलेल्या कोणत्याही कुटुंबासाठी आणि मुलीसाठी कठीण असू शकतं.'
जे घडायचंय ते घडून गेलंय...
नागा चैतन्यशी ख्रिश्चन पद्धतीनं केलेल्या लग्नात घातलेल्या गाऊनला कात्री का लावली हे सांगताना समंथा म्हणते, लग्नाच्या गाऊनला कात्री लावण्यामागे कोणताही सूडाचा उद्देश नव्हता. ही काही फार मोठी गोष्ट नाही. जे घडायचं होतं ते घडून गेलं आहे. मी ते लपवण्याचा प्रयत्न करत नाही. याचा अर्थ इतकाच आहे की जिथे गोष्टी संपल्या तिथून एक वेगळं आयुष्य सुरु होतंय. मी सध्या खूप खूष आहे. अनेक सकारात्मक बदल माझ्यात झालेत. अनेक चांगले प्रोजेक्ट्स मी सध्या करतेय.असं म्हणत संमंथा व्यक्त झाली.
हेही वाचा: