Samantha Ruth Prabhu: अभिनेत्री समंथा रूथ प्रभू बऱ्याच काळापासून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. इन्स्टाग्राम पोस्टमध्ये समांथाने एक मारतानाचा एक फोटो शेअर केला आहे. त्यामुळे तिनं आपलं नातं अधिकृत केल्याची चर्चा रंगली आहे. चित्रपट निर्माता राज निदिमोरूसोबतच्या नात्यामुळे समंथा चर्चेत आहे. त्यांना अनेक वेळा एकत्र पाहिल्यानंतर त्यांच्या नात्याबद्दलच्या अफवा सुरू झाल्या. दरम्यान, समंथाने राजसोबतचे फोटो शेअर करण्यास सुरुवात केली आहे. तथापि, दोघांपैकी कोणीही त्यांच्या नात्याला दुजोरा किंवा नकार दिलेला नाही. लेटेस्ट इन्स्टाग्राम पोस्टमध्ये समांथाने दिग्दर्शकाला मिठी मारतानाचा एक फोटो शेअर केला आहे. यामुळे राजसोबतचे तिचे नाते इन्स्टाग्रामवर अधिकृत होत असल्याचे मानले जाते.

परफ्यूम ब्रँड "सिक्रेट अल्केमिस्ट" लाँच

अलीकडेच, समांथा प्रभूने तिचा परफ्यूम ब्रँड "सिक्रेट अल्केमिस्ट" लाँच केला. अभिनेत्रीने या कार्यक्रमातील अनेक फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये, समंथा आणि राज एकत्रित दिसून येत आहेत. दुसऱ्या फोटोंमध्ये ते कार्यक्रमातील इतर पाहुण्यांसोबत आहेय  दोघांचा फोटो पाहून चाहते देखील उत्सुक आहेत. एका यूझर्सने लिहिले की, "तुम्हाला हे तुमचे नाते अधिकृत वाटते का?" दुसऱ्याने लिहिले, "नाते पक्के झाले आहे का?" तिसऱ्याने कमेंट केली, "मी तुम्हाला आठवा फोटो पोस्ट करू नका असे सांगितले होते, तुम्ही ऐकले नाही का?" दुसऱ्याने लिहिले, "माझ्या नजरा फक्त आठव्या फोटोवर झूम झाल्या." दुसऱ्याने लिहिले, "तर तुमचे गुपित आता गुपित राहिलेले नाही? तुमच्यासाठी आनंदी आहे, सॅम."

Continues below advertisement

Continues below advertisement

फोटो शेअर करत समंथा काय म्हणाली? (Samantha Ruth Prabhu News)

तिच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये, समंथा प्रभूने लिहिले, मित्र आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत गेल्या दीड वर्षात मी माझ्या करिअरमध्ये काही धाडसी पावलं उचलली आहेत. धोके घेतले, स्वतःच्या अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवला आणि शिकत राहिले. आज मी त्या छोट्या-छोट्या यशांचा आनंद साजरा करत आहे. मी ज्या हुशार, मेहनती आणि प्रामाणिक लोकांसोबत काम करते आहे, त्याबद्दल मी खूप आभारी आहे. श्रद्धा आणि आत्मविश्वासाने मला वाटतं की, ही फक्त सुरुवात आहे. समंथा प्रभू आणि राज निदिमोरू यांनी प्राइम व्हिडिओ मालिका "द फॅमिली मॅन 2" आणि "सिटाडेल: हनी बनी" मध्ये एकत्र काम केले. समंथाने राजसोबतचा फोटो शेअर केल्यावर त्यांच्या डेटिंगच्या अफवा तीव्र झाल्या, ज्यामुळे त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना उधाण आले. तथापि, समंथाने अद्याप काहीही पुष्टी केलेली नाही. दोघेही अनेकदा एकत्र सुट्टी घालवताना दिसतात, ज्यामुळे चर्चेला शिगेला पोहोचली आहे. 

समंथ सध्या दिग्दर्शक जोडी राज आणि डीके सोबत "रक्त ब्रह्मांड: द ब्लडी किंगडम" मध्ये काम करत आहे. या शोमध्ये आदित्य रॉय कपूर, अली फजल, वामिका गब्बी आणि जयदीप अहलावत यांच्याही भूमिका आहेत. सध्या निर्मिती क्षेत्रात असून, ही मालिका 2026 मध्ये प्रीमियर होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, राज निदिमोरू डीके सोबत त्यांच्या हिट मालिके "द फॅमिली मॅन" च्या सीझन 3 मध्ये काम करत आहेत, जी 21 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या