Salman Khan Matrubhoomi Main Hoon Song: भाईजान (Bhaijaan) सलमान खान (Salman Khan) सध्या आपल्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. 'मातृभूमी' (Matrubhoomi) या सिनेमाच्या रिलीजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. काही कारणास्तव या सिनेमाच्या (Entertainment) प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, सलमानचे फॅन्स आणि प्रेक्षकवर्ग 'मातृभूमी' या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, 'मातृभूमी' या सिनेमाचं नवीन गाणं नुकतेच रिलीज झाले आहे. ईदच्या खास प्रसंगी 'मातृभूमी' या सिनेमाचं 'मैं हूं' हे गाणं प्रदर्शित झालं आहे. गुरुवारी सकाळी सलमान खानने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपल्या आगामी सिनेमाच्या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या गाण्याला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओत सलमान खानसोबत चित्रांगदा सिंह दिसत आहे. हे गाणे पार्टी साँग किंवा रोमँटिक नसून, एक अत्यंत दु:खद आणि भावनिक गाणं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या गाण्यात काही बदल केले जात आहे. सलमान खानने या सिनेमातील गाण्याचा टीझर रिलीज केला आहे. गाण्याचा टीझर शेअर करत त्यानं लक्षवेधी कॅप्शन दिलं आहे.
सलमान खाननं शेअर केलं आगामी सिनेमाचं गाणं, इमोशनल व्हिडीओ पाहून चाहते भावुक (Salman Khan emotional song on EID)
सलमान खानने व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये, 'O o o o om 🕉️ o o o oomm🕉️O o ommm🕉️ O omm🕉️Main hooon' असं लिहिलं आहे. हा म्यूझिक व्हिडीओ समोर येताच सलमान खानच्या फॅन्सना प्रचंड आनंद झाला आहे. या गाण्याला प्रेक्षकांकडून पसंती मिळत आहे. बऱ्याच लोकांनी कमेंट सेक्शनमध्ये 'ईद मुबारक भाईजान' असं म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. एकानं कमेंटमध्ये, 'ईद मुबारक, मी तुमच्याच पोस्टची वाट पाहत होतो', असं म्हटलं आहे.
हे नवीन गाणं सलमान खान आणि चित्रांगदा या दोघांवर केंद्रीत आहे. या गाण्यात प्रेम आणि जोडीदारापासून दूर राहण्याची तळमळ देखील आहे. या दोन्ही भावना या गाण्यातून स्पष्ट दिसतात. हा व्हिडीओ पूर्णपणे ब्लॅक अँड व्हाईट आहे. 'मैं हूं' या गाण्याच्या ओरिजनल वर्जनमध्ये एका सैनिकाच्या परिवाराचा प्रवास दाखवण्यात आला आहे. या गाण्यात आनंदाचे क्षण आणि जोडीदारापासून दूर जाण्याचे दु:ख देखील दाखवण्यात आलंय. हे गाणं श्रेया घोषाल आणि अयानलाल यांनी गायले असून, हे गाणं आपल्या शूर सैनिकांनी केलेल्या त्यागाचे चित्रण करते.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
