Deool Band 2 Box Office Collection Day 7: मोहन जोशी (Mohan Joshi) आणि स्नेहल तरडे (Snehal Tarde) स्टारर  'देऊळ बंद 2' (Deool Band) ला सिनेमागृहात (Box Office Collection) प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 'देऊळ बंद'ला मिळालेल्या प्रचंड यशानंतर (Entertainment) 'देऊळ बंद 2' पाहण्यासाठीही सिनेमागृहात प्रचंड गर्दी जमत आहे.  'देऊळ बंद 2'चा  कमाईचा आलेख हा चढताच आहे. सातत्याने या सिनेमाच्या कमाईत वाढ होत आहे.  हा सिनेमा 21 मे 2026 रोजी सिनेमागृहात रिलीज झाला होता.  7 दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर  उत्तम कामगिरी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'देऊळ बंद 2' या सिनेमाने आतापर्यंत 25 कोटींचा टप्पा गाठला आहे.  सातव्या दिवशी या सिनेमाने नेमके किती कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले? जाणून घेऊयात.

सातव्या दिवशी 'देऊळ बंद 2' या सिनेमानं किती कोटींचे कलेक्शन केले? (Deool Band 2 crosses 25 crore at box office)

सॅकनिल्क ट्रेंडच्या रिपोर्ट्सनुसार,  'देऊळ बंद 2' या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी पाहायला मिळत आहे. सातव्या दिवशीही या सिनेमाने 3 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. सातव्या दिवशी या सिनेमानं 3.35 कोटींचे नेट कलेक्शन केले आहे. देशभरात या सिनेमाचे 1,878 शोज झाले.  या शोजमधून या सिनेमाने 3.35 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.    या बॉक्स ऑफिस कलेक्शनमधून प्रेक्षकांचा या सिनेमाला भक्कम पाठिंबा असल्याचं पाहायला मिळत आहे. 

गेल्या 6 दिवसांत या सिनेमानं 22.50 कोटींचे नेट बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.   या मराठी सिनेमाला कौटुंबिक प्रेक्षकांकडून प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळत असून,  याचे प्रतिबिंब त्याच्या बॉक्स ऑफिस कामगिरीतूनही दिसून येत आहे.  दरम्यान, या सिनेमाचा बॉक्स ऑफिस कलेक्शनचा आलेख चढताच राहिल, असं प्रेक्षकांकडून बोललं जात आहे.   

सात दिवसांत 'देऊळ बंद 2' या सिनेमानं किती कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले? (Deool Band Office Collection)

'देऊळ बंद 2' हा सिनेमा 21 मे रोजी सिनेमागृहात रिलीज झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या दिवशी या सिनेमानं 2.45 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. दुसऱ्या दिवशी या सिनेमानं  2.55 कोटी रुपयांची कमाई केली. तर,  23 मे रोजी अर्थात विकेंडला या सिनेमानं 4.85 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले.  तर, चौथ्या दिवशी या सिनेमानं 5.90 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 

दरम्यान, सोमवारी म्हणजेच  पाचव्या दिवशी या सिनेमानं  3.40 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.  तर, सहाव्या दिवशी या सिनेमानं 3.35 कोटींचा गल्ला जमावला.   मिळालेल्या माहितीनुसार, सातव्या दिवशी या सिनेमानं 3.35 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. देशभरात आतापर्यंत या सिनेमानं एकूण 25.85 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

स्वामींची कृपा...'देऊळ बंद 2' सिनेमाला प्रेक्षकांचा पाठिंबा; 6 दिवसांत कमावले 'इतके' कोटी

ABP माझाच्या बातम्या LIVE...