Salman Khan Shirtless Look: बॉलिवूडचा (Bollywood News) दबंग भाईजान सलमान खान (Salman Khan) अगदी साठीच्या उंबरठ्यावर आहे, तरीसुद्धा आज तो कित्येक तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे. सलमान खानच्या अनेक चर्चा नेहमीच रंगल्याचं आपण पाहतो. पण, बॉलिवूडचा (Bollywood Actor) दबंग सलमान खान आपल्या फिटनेसबाबत खूपच पझेसिव्ह आहे, याची अनेक उदाहरणं आपण पाहिलीत. पण, काही दिवसांपूर्वी सलमान खानला त्याच्या सुटलेल्या पोटावरुन जोरदार ट्रोल करण्यात आलेलं. पण, आता त्याच ट्रोलर्सना भाईजाननं चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे. सलमाननं आपले शर्टलेस फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सलमान खान सिक्स पॅक अ‍ॅब्सही फ्लॉन्ट करतोय. हे फोटो पाहता पाहता प्रचंड व्हायरल झाले. सध्या सलमान खानच्या शर्टलेस लूकची जोरदार चर्चा रंगली आहे. 

Continues below advertisement

सलमान खानचा फोटो व्हायरल (Salman Khan Photo Viral)

सलमान खाननं फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "काहीतरी साध्य करण्यासाठी तुम्हाला काहीतरी सोडून द्यावं लागतं... हे काहीच न सोडता आहे..." फोटोंमध्ये सलमानचे सिक्स-पॅक अ‍ॅब्स दिसतायत. सलमान खाननं शॉर्ट्स वेअर केली आहे आणि तो शर्टलेस दिसतोय. त्यानं गळ्यात त्याची चैन घातली आहे. सलमान खानच्या स्वॅगनं चाहते भलतेच प्रभावित झाले आहेत. सलमान खानच्या या लूकनं चाहते मोहीत झाले आहेत. लोक त्याला बॉलिवूडचा फिटनेस आयकॉन म्हणत आहेत. चाहते त्याच्या फोटोंवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करुन कमेंट करत आहेत. अर्जुन बिजलानीनं लिहिलंय की, "इंस्पायरिंग..." तर, वरुण धवननं लिहिलंय की, "भाई... भाई... भाई..."

सलमान खानच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, सलमान खानला सर्वात शेवटी 'सिकंदर' सिनेमात पाहिलं गेलेलं. या फिल्ममध्ये रश्मिका मंदाना त्याच्या अपोझिट रोलमध्ये होती. या सिनेमाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. सध्या तो बिग बॉस 19 चं सूत्रसंचालन करतोय. या शोच्या माध्यमातून तो त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल अपडेट्स देखील देत असतो.

काही काळापूर्वी तो काजोल आणि ट्विंकल खन्नाच्या 'टू मच विथ काजोल अँड ट्विंकल खन्ना' या चॅट शोमध्ये दिसला होता. त्यानं या शोमध्ये त्याच्या आयुष्यातील अनेक किस्से सांगितलेले.

सलमान खान आता बॅटल ऑफ गलवानमध्ये दिसणार आहे. तो सध्या या चित्रपटाचे शूटिंग करतोय. त्यानं लडाखमध्ये चित्रपटाचं शूटिंग देखील केलंय. शूटिंग दरम्यान त्याला किरकोळ दुखापत झाली.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

'इक्कीस' चित्रपटात दिसणाऱ्या 'या' गोड चेहऱ्याच्या अभिनेत्रीनं वेधलं बॉलिवूडचं लक्ष; अक्षय कुमारशी खास नातं...