Ikkis Actress Simar Bhatia: अभिनेता अगस्त्य नंदा ‘इक्कीस’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत सिमर भाटिया झळकणार आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये सिमरविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. अनेकांना या नव्या चेहऱ्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. विशेष म्हणजे सिमर ‘इक्कीस’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे आणि ती अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) कुटुंबातील आहे.

Continues below advertisement

सिमर भाटिया कोण आहे?

सिमर भाटिया ही अक्षय कुमारची बहीण अलका भाटियाची मुलगी आहे. म्हणजेच सिमर ही अक्षयची भाची आहे. अक्षयने अनेक वेळा आपल्या भाचीच्या प्रतिभेचं कौतुक केलं आहे. अलीकडेच ‘इक्कीस’चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अक्षयने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ट्रेलर शेअर करत सिमरसाठी एक गोड संदेशही लिहिला.

अक्षय आणि ट्विंकलची सिमरसाठी पोस्ट

अक्षयने लिहिलं, “माझी लहान सिमी आता लहान राहिली नाही... तुझ्या लिव्हिंग रूम परफॉर्मन्सपासून ते #Ikkis या मोठ्या पडद्यापर्यंत, मन अभिमानाने भरून आलं! ❤️ @simarbhatia18 आणि अगस्त्य, काय अप्रतिम स्क्रीन प्रेझेन्स आहे! संपूर्ण टीमला मनापासून शुभेच्छा.” यावर प्रतिक्रिया देताना सिमर म्हणाली, “"हमेशा के लिए तुम्हारी छोटी सिमी. हर चीज़ के लिए शुक्रिया. लव यू."

Continues below advertisement

अक्षयची पत्नी आणि लेखिका ट्विंकल खन्नानेदेखील सिमरसाठी एक खास पोस्ट शेअर केली. ट्विंकलने लिहिलं, “आपली @simarbhatia18 आता जगाच्या रंगमंचावर आली आहे. किती फ्रेश, नैसर्गिक आणि अफलातून अभिनय केलाय, माझं टॅलेंटेड छोटं  बाळ.” यावर सिमरने उत्तर दिलं, “या सुंदर शब्दांसाठी मनापासून धन्यवाद. लोक तुमच्या शब्दांसाठी पैसे देतात, आणि मला हे फुकट मिळालं, मी धन्य झाले.”

अक्षयसोबत दिसली होती एका अवॉर्ड शोमध्ये 

या वर्षाच्या सुरुवातीला मार्चमध्ये अक्षयने सिमारसोबत एका अवॉर्ड शोमध्ये हजेरी लावली होती. जानेवारीत अक्षयने त्याच्यासाठी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. अक्षयने एका वृत्तपत्राचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मला आठवते जेव्हा मी पहिल्यांदा माझा फोटो पेपरच्या मुखपृष्ठावर पाहिला होता. मला वाटले की हा सर्वात मोठा आनंद आहे, परंतु आज मला माहित आहे की माझ्या मुलाचा फोटो येथे पाहण्याचा आनंद हा सर्वात मोठा आनंद आहे. सिमर पुत्तर तू तह कमाल है'. ब्लेस यू माय बेबी, आसमान तुम्हारा है."

सिमारच्या पदार्पणाच्या चित्रपटाबद्दल

या चित्रपटात सिमर अगस्त्य यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे, अरुण खेत्रपालची प्रेयसीची भूमिका साकारणार आहे. श्रीराम राघवन दिग्दर्शित हा चित्रपट यावर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट सर्वात तरुण परमवीर चक्र विजेते अरुण खेत्रपाल यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात धर्मेंद्र, जयदीप अहलावत आणि सिकंदर खेर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. दिनेश विजान यांनी मॅडॉक फिल्म्सच्या माध्यमातून याची निर्मिती केली आहे.