KL Rahul Athiya Shetty Wedding : स्टार क्रिकेटर केएल राहुल  (Rahul Shetty) आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. तीन दिवसांचा शाही विवाहसोहळा खंडाळ्यात पार पडणार आहे. तीन दिवसानंतर म्हणजेच 23 जानेवारी रोजी हे लव्हबर्ड विवाह बंधनात अडकणार आहेत. सुनील शेट्टीनं याआधीच मुलीच्या लग्नाला मोजक्याच लोकांची उपस्थिती असेल, हे स्पष्ट केलेय. लग्नाची तयारी जोरदार सुरु आहे. केएल राहुल आणि आथियाचं घर रोषणाईनं सजलं आहे. 


सुनील शेट्टी यानं लग्नाला मोजकेच लोक उपस्थित असतील असं स्पष्ट केलेय. लग्नाला कोण कोण येणार याचा अंदाज वर्तवला जात आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, राहुल-आथियाच्या लग्नाला शाहरुख खान, सलमान खान, विराट कोहली यासारखे दिग्गज येणार आहेत. सुनील शेट्टी आणि माना आपल्या मुलीचं लग्न शाही करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीत. ते तयारीला लागले आहेत. खंडाळ्यातील जश्न बंगल्यासमोर असलेल्या मैदानात आथिया आणि राहुल लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. 21 तारखेपासून लग्नातील विविध विधी सुरु होणार आहेत. आथिया आणि राहुल यांना सिंपल लग्न करायचं होतं, असे सुनील शेट्टीने सांगितलेय. 


सलमान-शाहरूख लग्नाला राहू शकतात उपस्थित - 
आथिया आणि राहुल या लव्हबर्डच्या लग्नाला कोण कोण येणार, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलेय. अद्याप याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण सलमान खान, शाहरुख खान, विराट कोहली, अर्जुन कपूर लग्नाला उपस्थिती लावण्याची शक्यता आहे. सध्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. सुनील शेट्टीचे जवळच्या लोकांचं खंडाळ्याला येणं-जाणं सुरु झालं आहे. 21 जानेवारीपासून लग्नाच्या विधीला सुरुवात होणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या शाही विवाहात संगीत, हळदी, लेडीज नाइट.. होणार आहे. सुनील शेट्टीने लग्नाला येणाऱ्यांसाठी शानदार सोय केली आहे.  अथिया आणि केएल राहुलच्या हळद, मेहेंदी आणि संगीत सोहळ्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. 21 आणि 22 जानेवारीला हळद, मेहेंदी आणि संगीताचा कार्यक्रम पार पडणार आहे. तर 23 जानेवारीला अथिया आणि केएल लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. 


अथियाने 2015 मध्ये अॅक्शन 'हिरो' या चित्रपटामधून बॉलिवूमध्ये पदार्पण केले होते. ‘मुबारकान’, ‘नवाबजादे’ आणि ‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटांमध्ये आथियाने महत्वाची भूमिका साकारली आहे. केएल राहुल भारतीय संघाचा उप कर्णधार आहे. तो भारतीय संघाचा नियमीत सदस्य आहे. तर आयपीएलमध्ये लखनौ संघाचा कर्णधार आहे.