Salman Khan on Jail Days Alliance: सलमान खानने (Salman Khan) सध्या 'अलायन्स' (Alliance) या रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली. भाऊ सोहेल खानची (Sohail Khan) भेट घेत त्याने इतर स्पर्धकांशी संवाद साधला. सलमान खानच्या एन्ट्रीचा व्हिडीओ सोशल मीडियात (Social Media) व्हायरल होत आहे.    सलमान खानची 'अलायन्स'या घरात एन्ट्री होताच, सर्व स्पर्धकांना धक्का बसला. यानंतर सलमान खान आणि सोहेल खान यांच्यात संवाद झाला. दोघांमध्ये वेट लॉसवरुन बोलणं होतं.  

Continues below advertisement

सलमान खानने तुरुंगातील किस्सा शेअर केला (Salman Khan on Jail Days Shares in Alliance platform)

सलमान खानने सर्वात आधी सोहेल खानच्या तलाकवर भाष्य केलं.  सलमान म्हणाला की, सीमापासून विभक्त होण्याची जबाबदारी सोहेलने  स्वत:वर  घेतली होती. पण एक भाऊ म्हणून त्याला  माहित होते की, सोहेलने  त्यांचे नाते वाचवण्यासाठी किती प्रयत्न केले होते.   सलमान खानने यावेळी स्पर्धकांशी  संवाद साधताना तुरुंगातील काळाबद्दल सांगितले.

सलमान खान म्हणाला की, 'अनेक वर्षांपूर्वी, जेव्हा मी तुरुंगात होतो,  जेलची लोखंडी गज अगदी समोर असायची. अगदी लहानशा जागेत 50 ते 70 लोक राहत होते. एका खोलीत एकच बाथरुम असायचा.  ज्यात इंडियन स्टाइल कमोड होता.  या कमोडमध्ये पाल असायची.  संपूर्ण बाथरुम अस्वच्छ असायचं', असं सलमान खान म्हणाला.  सलमान खानचा अनुभव ऐकल्यानंतर उपस्थित सपर्धक आणि सोहेल खान भावुक झाला होता.

Continues below advertisement

 

यावेळी सलमान खानने वेट लॉस ट्रान्सफॉर्मेशनबद्दलही भाष्य केलं. जेव्हा सलमान खान 'अलायन्स'च्या घरी आला होता. तेव्हा सोहेल खानने त्याला सिक्स पॅक Abs दाखवले.  त्याने सलमान खान, शोमध्ये 12 किलो वजन कमी झाले असल्याचं सांगितलं. यानंतर सलमान खाननेही 16 किलो कमी झाले असल्याचंही सांगितलं.    सध्या सलमान खानचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Marathi Actor Hrishikesh Kanade: मराठी रंगभूमीवर शोककळा; तरुण अभिनेत्याचं निधन, अवघ्या 38 व्या वर्षी अकाली एक्झिट